मुंबई :मुंबईतील पहिले रेल्वे स्थानक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अथवा अर्थात विक्टोरिया टर्मिनस. या रेल्वे स्थानकाचा आता पुनर्विकास करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचाही समावेश (Redevelopment of CSMT) आहे. या प्रस्तावित पुनर्विकासामध्ये प्रत्येक स्थानकावर सर्व प्रवासी सुविधांसह एक प्रशस्त छताचा प्लाझा असणार आहे. ज्यामध्ये रिटेल, कॅफेटेरिया, करमणुकीच्या सुविधांसाठी जागा ठेवली जाणार आहे. रेल्वे स्थानकाच्या मूळ हेरिटेज इमारतीला कोणताही धक्का न लावता रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूंना स्टेशनची इमारत बांधून शहराच्या दोन्ही बाजू स्टेशनशी जोडल्या जाणार (Know Redevelopment of CSMT) आहेत.
काय असतील अन्य सुविधा ?प्रस्तावित पुनर्विकासामध्ये फूड कोर्ट, वेटिंग लाउंज, मुलांसाठी खेळण्याची जागा, स्थानिक उत्पादनांसाठी जागा इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. स्थानके आरामदायी करण्यासाठी, योग्य रोषणाई, मार्ग शोधणे, चिन्हे, ध्वनि, लिफ्ट, एस्केलेटरइत्यादी प्रवासी सुविधा करण्यात येणार आहेत. वाहनतळाच्या पुरेशा सुविधांसह वाहतूक सुरळीत होण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे.
काय अडचण? काय उपाय?सध्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी असल्याने प्रवाशांना वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. उत्तरेला बाहेर पडण्यासाठी दरवाजा नसल्याने क्रॉफर्ड मार्केट परिसराशी जोडले जात नाही. तसेच अन्य मार्गांशी जोडले जाण्याची सुविधा नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागते तसेच दिव्यांगांना वेगळा मार्ग सध्या अस्तित्वात नाही. यावर उपाय म्हणून आता मेट्रो, बस इत्यादी वाहतुकीच्या इतर पद्धतींसह एकीकरण केले जाणार आहे. सौरऊर्जा, जलसंधारण-पुनर्वापर आणि सुधारित वृक्षाच्छादनासह ग्रीन बिल्डिंग तंत्राचा वापर केला जाईल. दिव्यांगांना अनुकूल सुविधा देण्यासाठी विशेष काळजी घेतली जाईल. त्याचप्रमाणे इंटेलिजेंट बिल्डिंगच्या संकल्पनेवर ही स्थानके विकसित केली जाणार आहेत, अशी माहिती रेल्वे व्यवस्थापनाने दिली (CSMT) आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या या इमारतीला दीडशेहून अधिक वर्ष झाली आहे. इंग्रजांनी बांधलेल्या या इमारतीत आता पहिल्यांदाच बदल होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे भारतातील एक ऐतिहासिक स्थानक आहे, त्यामुळे या रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करताना अत्यंत दर्जेदार व्हायला हवा . या स्थानकावर विविध राज्यांमधून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. त्यासोबतच मुंबईतील शेकडो लोकलच्या फेऱ्या देखील याच स्थानकातून नियंत्रित केल्या जातात. त्यामुळे इथे दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी हजेरी लावत असतात. या प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्थानकाच्या प्रस्तावित बदलामध्ये सरकारने सर्वात जास्त लक्ष देऊन काम करावे सुरक्षेलाच सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे मत उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या सरचिटणीस लता आरगडे यांनी व्यक्त केले (grand redevelopment of CSM) आहे.
बदल प्रवाशांच्या हिताचे असावे -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जागतिक पातळीवर महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या या स्थानकाच्या ऐश्वर्यात आणखी भर पडेल. मात्र, सरकारने हे बदल करताना प्रवाशांचा अधिकाधिक विचार करणे आवश्यक आहे. व्यापारी किंवा इतर घटकांचा नफा डोळ्यासमोर ठेवून हे बदल न होता प्रवाशांना लाभ देतील असे बदल व्हावेत, अशी प्रतिक्रिया उपनगरीय रेल्वे प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर शेलार यांनी दिली (Know what it will be like Redevelopment of CSMT) आहे.