मुंबई- मुझप्फरपूर येथील रेल्वे स्थानकात मृत आईला उठवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेबाबत सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान भावूक झाला. आई गमावल्याचे दु:ख समजू शकतो, असे म्हणत शाहरुख खानने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शाहरुख खानच्या मीर फाऊंडेशनने त्या चिमुकल्याला मदतीचा हात दिला आहे.
मृत आईला चिमुकला उठवतानाचा व्हिडिओ पाहून शाहरुख झाला भावूक; म्हणाला. . . - लेटेस्ट न्यूज इन मुंबई
मुझफ्फरपूर येथील रेल्वे स्थानकावर मृत आईला उठवत असलेल्या चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या हृदयद्रावक व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. टाळेबंदीमुळे झालेल्या कामगारांच्या वेदना या व्हिडिओतून पुढे आल्या.
बिहारमधील मुझफ्फरपूर येथील रेल्वे स्थानकावर मृत आईला उठवत असलेला चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या हृदयद्रावक व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. या व्हिडिओतून संचारबंदीचा परिणाम किती वाईट झाला याचा प्रत्यय आला.
मीर फाऊंडेशनने त्या चिमुकल्या मुलाचा शोध घेऊन त्याला मदत केली आहे. सध्या हा चिमुकला त्याच्या आजोबा निगराणीत आहे. मीर फाऊंडेशनने त्याला मदतीचा हात दिला आहे. त्यानंतर अभिनेता शाहरुख खानने देखील याबाबतची माहिती सोशल माध्यमातून देत त्या चिमुकल्याला मदत करणाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.