महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Budget 2022 : जाणून घ्या, अर्थसंकल्पातून शिक्षण क्षेत्राला काय मिळणार ? - Finance minister Ajit Pawar

महर्षी कर्वे, साने गुरुजी, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी 1 कोटींचा ( Fund for school development ) निधी राज्य सरकार देणार आहे. शाळांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हा स्तरावर 5 टक्के निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ( Finance minister Ajit Pawar ) अर्थसंकल्पात ( MH Budget announcements for education ) घोषणा केली.

शिक्षण
शिक्षण

By

Published : Mar 11, 2022, 4:45 PM IST

मुंबई-राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प ( Maharashtra budget 2022 ) सादर केला. यावेळी कौशल्य, रोजगार आणि नाविन्यता, शिवाजी विद्यापीठातील केंद्रासाठी 10 कोटी अशा विविध तरतुदी अशा विविध घोषणा ( Provisions for education in Maharashtra Budget 2022 ) केल्या आहेत.

  • कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाला 615 कोटी रुपयांची तरतूद
    शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पातील तरतुदी
  • शिष्यवृत्ती, फेलोशिपद्वारे सर्व विभागांच्या योजना लाभार्थ्यांच्या आधार कार्डशी जोडणार संगणक आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI drives scheme for students )
  • संदेशवहन उपग्रहण, ड्रोन टेक्नॉलॉजी जागतिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना संधी साठी प्रत्येक विभागात इनोव्हेशन हब सुरू करणार ( Innovation hub in Maharashtra )
  • तरुणांना विशेष संधीसाठी स्टार्ट अपसाठी भांडवल, 100 कोटी रकमेचा शासनाचा स्टार्ट अप फंड उभारणार ( 100 crore Start up Fund )
  • कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाला 615 कोटी रुपयांची तरतूद
  • लता मंगेशकर यांच्या नावानं उभारण्यात येणाऱ्या केंद्रासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद ( MH gov fund for Lata Mangeshkar center )
  • शिवाजी विद्यापीठातील केंद्रासाठी 10 कोटी आणि मुंबई च्या रत्नागिरीतील उपकेंद्रासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद
  • महापुरुषांच्या नावे अध्यासन केंद्र उभारण्यासाठी 3 कोटी रुपयांची तरतूद
  • एसएनडीटी विद्यापीठासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद
  • महर्षी कर्वे, साने गुरुजी, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी 1 कोटी निधी
  • शाळांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हा स्तरावर 5 टक्के निधी

ABOUT THE AUTHOR

...view details