मुंबई - भारतीय रेल्वेने शेतकर्यांसाठी सुरु केलेल्या किसान रेल्वेला महाराष्ट्रातून तुफान प्रतिसाद मिळत ( Kisan Railway Maharashtra ) आहे. मध्य रेल्वेवर सुरु झालेली भारताची पहिली किसान रेल आता ट्रेंड सेटर बनली आहे. गेल्या १६ महिन्यात मध्य रेल्वेवरून ( Central Railway ) ९०० किसान रेल्वेच्या फेऱ्या झाल्या असून, त्यांच्यामार्फत संपूर्ण देशभरात ३ लाख १० हजार टन वजनी फुले, फळे, भाज्या यांसारख्या नाशवंत पदार्थांची वाहतूक ( Transportation Of Agricultural Products ) केली. किसान रेल्वेने जलद वाहतूक, शून्य अपव्यय, ५० टक्के अनुदानासह, कृषी उत्पादनासाठी मोठ्या आणि नवीन बाजारपेठांमध्ये विक्रीची संधी उपलब्ध होते.
किसान रेल्वेच्या ९०० फेऱ्या पूर्ण
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,पहिली किसान रेल सुरू झाल्यापासून, मध्य रेल्वेने किसान रेल्वेच्या ९०० फेऱ्यांमधून ३ लाख १० हजार ४०० टन नाशवंत मालाची वाहतूक केली आहे. ७ ऑगस्ट २०२० रोजी पहिली किसान रेल आणि २८ डिसेंबर २०२० रोजी किसान रेलची १०० वी फेरी चालवण्याचा मान मध्य रेल्वेला मिळाला होता. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी वेबलिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवला होता. किसान रेल्वे ५०० वी फेऱ्या १२ ऑगस्ट २०२१ रोजी चालली. आता, किसान रेल्वेची ९०० वी फेरी १ जानेवारी २०२२ रोजी सावदा येथून आदर्श नगर, दिल्ली येथून निघाली आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी समृद्धीचे इंजिन