मुंबई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमैया आणि नील सोमैया यांनी त्यांची भेट ( Kirit Somaiya Meet CM Eknath Shinde ) घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याबद्दलचे त्यांनी एक ट्वीट केले. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका ( Kirit Somaiya On Uddhav Thackeray ) करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिला आहेत.
किरीट सोमैयाचे ट्वीट- 'मंत्रालयात आज 'रिक्षावाला' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री ना हाठविल्या बदल अभिनंदन केले' असे ट्वीट करुन त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे.
नवलानी यांना क्लीनचिट -शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी व्यावसायिक जितेंद्र नवलानी यांच्यावर ईडीची भीती दाखवून अनेक व्यापारी व बांधकाम व्यवसायिकांकडून पैसे उकळण्याचा व खंडणी वसुलीचा आरोप केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकरणाची चौकशी देखील सुरू झाली. मात्र, आता शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर काही तासातच नवलानी यांना क्लीनचिट मिळाली आहे. याच प्रकरणात सहआरोपी असलेले किरीट सोमैया यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की, उद्धव ठाकरे, संजय राऊत, संजय पांडे आता पंतप्रधान मोदींची माफी मागावी.