मुंबई - भांडुप येथे कोविड सेंटर येथील जमीन ही महाराष्ट्र सरकारची आहे. ती एका व्यक्तीला साठ वर्षासाठी भाड्याने दिली होती. पण 22 एकर जमीन महाराष्ट्र सरकारने महापालिकेला कोविड सेंटर उभारण्यासाठी ओळखीचा बिल्डरच्या साह्याने 3 हजार करोड रुपयाला भाडेतत्त्वावर घेतली. त्यामधून मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषदेत केला.
मुंबई महापालिकेने 5 हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी खाजगी जागा हवी आहे, अशी जाहिरात दिली. 23 ऑगस्ट 2020 ला 2 कंपन्यांनी प्रस्ताव सादर केले होते. त्याबाबत बोलताना भाजपचे नेते किरीट सोमैया म्हणाले, की दिलीप शहा यांचा प्रस्ताव बोगस होता. कारण ती त्यांच्या मालकीची जागा नव्हती. महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती अधिकारानुसार भांडुपच्या जागेचा प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या योग्य नाही. तरीही भांडुपचा प्रस्ताव निवडला. हे कागदोपत्री दाखविण्यासाठी हा खेळ केला गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या साह्याने हा भ्रष्टाचार झाल्याचा किरीट सोमैया यांनी आरोप केला.
मुख्यमंत्र्यांकडून 3 हजार कोटी रुपयांचा जमीन घोटाळा; किरीट सोमैयांचा आरोप
महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती अधिकारानुसार भांडुपच्या जागेचा प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या योग्य नाही. तरीही भांडुपचा प्रस्ताव निवडला. हे कागदोपत्री दाखविण्यासाठी हा खेळ केला गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या साह्याने हा भ्रष्टाचार झाल्याचा किरीट सोमैया यांनी आरोप केला.
मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार या जागेचा ताबा 8 ऑक्टोबर 2020 रोजी स्वास कन्स्ट्रक्शनच्या हातात आला. ही जागा मुळात सरकारची असल्याचा दावा किरीट सोमैया यांनी केला. रुग्णालयासोबत या जागेवर कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचा प्रस्तावही दिला गेला. तडकाफडकी रुग्णालय उभारणी करण्याचे निमित्त दाखवून खासगी बिल्डरची जागा विकत घेणे म्हणजे मुंबईकरांच्या माथ्यावर 12 हजार कोटींचा खर्च लादला जाणार आहे. 10 हजार कोटींची जागा व बांधकामासह चालविण्यासाठी 2 हजार कोटी लागणार आहेत. ठाकरे सरकारचा हा 12 हजार कोटींचा 5 हजार खाटांच्या रुग्णालयाचा, कन्व्हेशन सेंटर आणि जमीन घोटाळा उद्धव ठाकरेंनी केल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला.
मुंबई महापालिकेने मे महिन्यात कोरोनाचे 7 हजार मृत्यू लपविल्याचा दावाही सोमैया यांनी पत्रकार परिषदेत केला.