महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai : कुर्लात पुरी भाजी विक्रेत्याचे ग्राहकाशी भांडण; चिमुकलीसह वृद्धावर फेकले उकळते तेल - पुरी भाजी विक्रेत्याने दोघांवर उकळते तेल फेकले

कुर्लातील कसाई वाडी येथे शिल्लक कारणावरून झालेल्या वादाने मोठे स्वरूप घेतले आहे. या पुरीभाजी विकणाऱ्या व्यक्तीने एका तरुण मुलीवर तसेच वृद्ध व्यक्तीवर गरम तेल फेकल्याचा ( throws boiling oil on the childe and old man ) धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला.

throws boiling oil on the childe and old man
कुर्लात पुरी भाजी विक्रेत्याचे ग्राहकाशी भांडण

By

Published : Mar 19, 2022, 7:20 PM IST

मुंबई -कुर्लातील कसाई वाडी येथे शिल्लक कारणावरून झालेल्या वादाने मोठे स्वरूप घेतले आहे. या पुरीभाजी विकणाऱ्या व्यक्तीने एका चिमुकलीसह तसेच वृद्ध व्यक्तीवर गरम तेल फेकल्याचा ( throws boiling oil on the childe and old man ) धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला. या प्रकरणाचा तपास चुनाभट्टी पोलीस करत आहे. दोन्ही जखमींना सायन रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गुन्हा दाखल -

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कुर्ला भागात कसाई वाडीत हा प्रकार घडला. पुरी भाजी विकणाऱ्या व्यक्तीचे वृद्धासोबत भांडण झाल्याची माहिती आहे. याच रागातून पुरीभाजी घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांवर विक्रेत्याने उकळते तेल फेकल्याचा आरोप आहे. 7 वर्षांची चिमुकली आणि वृद्ध यामध्ये भाजले आहेत. या प्रकरणाचा तपास चुनाभट्टी पोलीस करत असून आरोपी व्यक्ती विरोधात या प्रकरणात कलम 300, 337, 338, 285 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून आरोपी फरार आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.

7 वर्षांच्या चिमुकलीसह वृद्ध भाजला -

पुरी भाजी विक्रेत्याने दोघांवर उकळते तेल फेकले. मुंबईतील कुर्ला भागात कसाई वाडीत हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला. 7 वर्षांची मुलगी आणि वृद्ध व्यक्ती यामध्ये भाजले आहेत. पुरी भाजी विकणाऱ्या व्यक्तीचे वृद्धासोबत भांडण झाले. याच रागातून पुरी भाजी घेण्यासाठी आलेल्या दोघांवर विक्रेत्याने उकळते तेल फेकल्याचा आरोप आहे.

हेही वाचा -Pune Car Factory Fire : कासुर्डीतील कार केअर प्रोडक्ट्स कंपनीच्या उत्पादन युनिटमध्ये भीषण आग

ABOUT THE AUTHOR

...view details