महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई : गीतकार जावेद अख्तर मानहाणी प्रकरणी कंगना रणौत अंधेरी कोर्टात हजर

कंगनाला वेळोवेळी नोटीस बजावल्यानंतरही ती कोर्टात हजर झाली नसल्याने तिला आज २० सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश न्यायलयाकडून देण्यात आले होते.

Kangana Ranaut latest news
Kangana Ranaut latest news

By

Published : Sep 20, 2021, 12:15 PM IST

Updated : Sep 20, 2021, 1:50 PM IST

मुंबई :गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रणौत विरोधात मानहाणीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी कंगनाला वेळोवेळी नोटीस बजावली होती. त्यानंतरही ती कोर्टात हजर झाली नसल्याने तिला आज २० सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच यावेळी न्यायालयात हजर न राहल्यास अटक वॉरंट काढू, असा सूचक इशारा तिला अंधेरी कोर्टाकडून देण्यात आला होता. त्यामुळे आज कंगना कोर्टात हजर झाली होती. यावेळी न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 15 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे. तसेच हे प्रकरण अन्य न्यायालयात चालवण्यासंदर्भात 1 ऑक्टोबररोजी सुनावणी करण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

व्हिडीओ

आज अंधेरी कोर्टात सुनावणी
जावेद अख्तर यांनी कंगना रानौत विरोधात मानहाणीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाला दिलासा दिला नव्हता. त्यामुळे अंधेरी कोर्टात हजर होणे कंगानाला अनिवार्य होते. १४ सप्टेंबरला याबाबत सुनावणी झाली असता कंगनाला कोरोनाचे लक्षणे आढळले होते. तिची कोविड चाचणी झाली. रिपोर्टसाठी विलंब होत असल्याचे कंगनाचे वकील ऍड सिद्दिकी यांनी कोर्टाला सांगितले. त्यावर जावेद अख्तर यांचे वकील ऍड भारद्वाज यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यावर जर कंगना पुढील तारखेस कोर्टात हजर राहिली नाही तर आम्ही अटक वॉरंट काढू असे स्पष्ट शब्दात कोर्टाने सुनावले आणि सुनावणी २० सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. यामुळे आज कंगना कोर्टात हजर झाली आहे.

काय म्हणाले कंगनाचे वकील -

अशा प्रकारच्या मानहाणी प्रकरणात कंगनाला न्यायालयात येणं आवश्यक नाही. आतापर्यंत पोलिसांनी कोणतेही बयान नोंदवलेले नाही. तसेच आमच्याकडे सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे, अशी प्रतिक्रिया कंगनाचे वकील रिजवान सिद्दीकी दिली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

'अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिपब्लिक टीव्हीवर मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांनी घेतलेल्या मुलाखतीत कंगनाने आपल्याविरोधात बिनबुडाचे आरोप करून नाहक बदनामी केली', अशी तक्रार गीतकार जावेद अख्तर यांनी वकिल जय भारद्वाज यांच्यामार्फत केली. याविषयी पोलिसांच्या अहवालाची दखल घेऊन न्यायालयाने कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, वारंवार नोटीस देऊनही कंगना न्यायालयात हजर राहिली नाही. त्यामुळे महानगर न्यायदंडाधिकारी आर. आर. खान यांनी कंगनाला अखेरची संधी देत पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश मागील सुनावणीत दिले होते. शिवाय कंगना पुन्हा गैरहजर राहिल्यास तिच्याविरोधात वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुभा अख्तर यांना दिली होती.

हेही वाचा - आयकर विभागाच्या छाप्यावर सोनू सुदने ट्विटद्वारे दिली प्रतिक्रिया, म्हणाला....

Last Updated : Sep 20, 2021, 1:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details