मुंबई 2020 मध्ये वादग्रस्त ट्विट केल्याबद्दल कमाल रशीद खानला मालाड पोलिसांनी Kamal Rashid Khan arrested by Malad Police अटक केली. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला आज बोरिवली न्यायालयात हजर करण्यात Borivali Court today करण्यात आले. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
चित्रपट अभिनेता आणि निर्माता कमाल खानला काल रात्री उशिरा मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली. कमाल खानला मुंबईच्या मालाड पोलिसांमार्फत अटक करण्यात आली. 2020 मध्ये कमाल खानने ट्विटरवर एक वादग्रस्त ट्विट केले होते. त्या प्रकरणात कमाल खानच्या विरोधात मालाड पोलिस स्टेशनमध्ये आयपीसी आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेली दोन वर्षे विदेशात असल्याने कमाल खानला अटक करता आली नाही. मात्र काल विदेशातून कमाल खान मुंबईत पोहोचताच पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. आता पोलीस कमालला मुंबईतील बोरिवली कोर्टात हजर करून त्याच्या पुढील कोठडीची मागणी करणार आहेत.
अभिनेता इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या 2020 मध्ये झालेल्या मृत्यूबाबत अपमानास्पद ट्विटसुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कमाल खानने अभिनेता इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या 2020 मध्ये झालेल्या मृत्यूबाबत अपमानास्पद ट्विट केले होते. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते राहुल कनाल यांनी कमालच्या या वादग्रस्त ट्विटबाबत मुंबई पोलिसांत कमाल विरोधात तक्रार केली होती. पोलिसांनी कमाल खानवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मात्र कमाल खान परदेशात असल्याने त्याच्यावर कारवाई होऊ शकली नाही, मात्र कमाल खान मुंबईत पोहोचताच पोलिसांनी त्याला अटक केली.
असे केले होते वादग्रस्त ट्विट -उल्लेखनीय म्हणजे कमाल खान आपल्या वादग्रस्त भाषेमुळे नेहमीच चर्चेत राहतो. मात्र आता त्याला वादग्रस्त ट्विटमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. कमाल खानने 2020 मध्ये ट्विट करून अभिनेते इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केली होती. ट्विटमध्ये कमाल खानने इरफान खानबद्दल म्हटले होते की, अल्लाह, कोणावरही वाईट वेळ येऊ नये, परंतु इरफान खान हा एक आवडता आणि अतिशय दयाळू व्यक्ती आहे. इरफान आपल्या फिल्ममेकरला कुत्रा म्हणायचा आणि अनेक चित्रपटांचे शूटिंग करून अपूर्ण राहिले. निर्माते रडतच राहतीलय हे ट्विट इरफानच्या मृत्यूनंतर कमालने ट्विट केले होते. तसेच कमालने अभिनेते ऋषी कपूर यांच्याबद्दलही ट्विट केले होते. ज्यात कमलने लिहिले होते ऋषी कपूर एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल. सर ठिक होकर जल्दी वापस आना, निकल मत लेना क्यू की २ से ३ दिन मे दारू की दुकन खुलने वाली है