महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कल्याण ते कसारा मार्गावर ३ तासाचा मेगाब्लॉक - कसारा

शहाड येथील पादचारी पूल आणि इतर पायाभूत सुविधेच्या कामांसाठी आज सकाळी पावणे अकरा ते दुपारी २ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. या वेळी कल्याण ते कसारा लोकलसेवा बंद असणार आहे.

मेगाब्लॉक

By

Published : Feb 10, 2019, 3:04 PM IST

मुंबई - शहाड येथील पादचारी पूल आणि इतर पायाभूत सुविधेच्या कामांसाठी आज सकाळी पावणे अकरा ते दुपारी २ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. या वेळी कल्याण ते कसारा लोकलसेवा बंद असणार आहे.

ब्लॉकनंतर दुपारी सव्वा दोन वाजता कल्याणहून आसनगावकडे लोकल रवाना होईल. सकाळी पावणे अकरा ते दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत कल्याण ते कसारा लोकलसेवा बंद असणार आहे. मेगाब्लॉकनंतर दुपारी दीड वाचता कसारा ते सीएसएमटी लोकल चालविण्यात येईल. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी-कल्याण-सीएमएसटी विशेष लोकल चालविण्यात येतील.

या गाड्या रद्द

  • डाउन मार्गावरील मेल, एक्स्प्रेस
  • गाडी क्रमांक ५११५३ मुंबई-भुसावळ पॅसेंजर.
  • गाडी क्रमांक १२०७१ दादर-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस
  • गाडी क्रमांक १२११७ लोकमान्य टिळक-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस
  • गाडी क्रमांक २२१०१ मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस

अप मार्गावरील मेल, एक्स्प्रेस

  • गाडी क्रमांक ५११५४ भुसावळ-मुंबई पॅसेंजर
  • गाडी क्रमांक १२११८ मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेस
  • गाडी क्रमांक १२०७२ जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस
  • गाडी क्रमांक २२१०२ मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस

ABOUT THE AUTHOR

...view details