महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बाबू गेनूला इंग्रजांनी चिरडून मारले, तसेच लखीमपूरमध्ये भाजप सरकारचे कृत्य -संजय राऊत - Congress general secretary Priyanka Gandhi

मुंबई - ब्रिटिष जे वागले तेच आज भारतात भाजप वागत आहे. विदेशी मालावरील बहिष्काराच्या चळवळीत महाराष्ट्रातील मुंबई शहरात ब्रिटिश माल वाहून नेणार्‍या ट्रकाला रोखण्यासाठी बाबू गेनू रस्त्यावर आडवा पडला. त्यामध्ये ब्रिटिशांनी त्याच्या अंगवारू ट्रक घातली. त्यामध्ये त्याचा (१२ डिसेंबर १९३०)रोजी मृत्यू झाला. असाच प्रकार उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर येथील खेरी जिल्ह्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपा कार्यकर्त्यांनी गाडी घालून केला आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत

By

Published : Oct 4, 2021, 12:53 PM IST

मुंबई - ब्रिटिष मालावरील बहिष्काराच्या चळवळीत महाराष्ट्रातील मुंबई शहरात ब्रिटिश माल वाहून नेणार्‍या ट्रकाला रोखण्यासाठी बाबू गेनू रस्त्यावर आडवा पडला. त्यामध्ये ब्रिटिशांनी त्याच्या अंगवारू ट्रक घातली. त्यामध्ये त्याचा (१२ डिसेंबर १९३०)रोजी मृत्यू झाला. असाच प्रकार उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर येथील खेरी जिल्ह्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपा कार्यकर्त्यांनी गाडी घालून केला आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

शिवसेना खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलताना

शेतकरी तुम्हाला देशद्रोही वाटले का?

शेतकऱ्यांवर केंद्रीय गृहराज्यमंत्यांचा मुलाने गाडी चडवली हा क्रूर प्रकार आहे. यामध्ये शेतकऱ्यांबद्दलचा भाजपच्या मनात द्वेश आहे. शेतकरी त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत तीन कृषी कायदे रद्द करा म्हणून सांगत आहेत. मात्र, हे होत नाही. तसेच शेतकरी तुम्हाला देशद्रोही वाटले का? ज्यांना अशाप्रकारे चिरडून टाकलं पाहिजे? असा संतप्त सवालही राऊत यांनी यावेळी उपस्थित केला आहे. दरम्यान, विरोधी पक्षाच्या लोकांना जान्यासाठीही बंदी केली आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना जाण्यापासून रोखले. निर्भयासारखे प्रकार होतात तेव्हाही विरोधी पक्षांच्या लोकांना जाण्यापासून रोखणे ही कोणती लोकशाही आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

'ही भारतीय जनता पक्षाचे अधिकृत पॉलिसी धोरण आहे का?'

महाराष्ट्रामध्ये साकीनाकामधले प्रकरण झाले तेव्हा तिथे विरोधी पक्षाने किती मोठा हंगामा केला. आम्ही कोणाला थांबवले नाही. आज देशामध्ये झाले त्यावर कोणी आवाज उठवणार आहे का? अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या विरोधात ज्या कारवाया सुरू आहेत ही भारतीय जनता पक्षाचे अधिकृत पॉलिसी धोरण आहे का? तसेच, नरेंद्र मोदी यांच्या भाषणात शेतकऱ्यांच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगतात विरोधी पक्षांवर टीका करतात, ठीक आहे. पण ज्या पक्षाचे प्रधानमंत्री आहेत त्या पक्षातील नेत्यांची मुलं शेतकऱ्यांवर गाड्या घालून त्यांना ठार मारतात हे काय आहे? हे कृत्य ब्रिटिश राज्यात होत होते असही राऊत म्हणाले आहेत.

काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी

'निवडणूक लढण्यासाठी त्यांनी आमचा रडका माणूस घेतला'

देवेंद्र फडणवीस हे नांदेड जिल्ह्यात दौऱ्यावर शेतकऱ्यांचे दुःख समजून घ्यायला गेले होते, की शिवसेनेचा माणूस त्यांच्या पक्षात घ्यायला गेले होते? असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे. गेल्या अनेक दिवसांत आपल्याकडे काही नसल्याने त्यांचे असे उद्योग सुरू आहेत. ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसची लोक घेतच होते. स्वतःचं भाजपकडे काही नाही. निवडणूक लढण्यासाठी त्यांनी आमचा माणूस घेतला होता. तोही रडका असही ते म्हणाले आहेत. मात्र, हे राजकारण फार काळ टिकणार नाही. लोक सगळ समजून आहेत.

हेही वाचा -लखीमपूर खीरी हत्याकांड : पोलिसांनी ताब्यात घेताच प्रियांका गांधींचा दिसला "दुर्गावतार"

ABOUT THE AUTHOR

...view details