मुंबई - शहरी आणि ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी नवीन साडेबारा हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख दिली. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला आहे.
खूशखबर; राज्यात नवीन साडेबारा हजार पोलिसांची 'जम्बो भरती' - महाराष्ट्र पोलीस दल
राज्यात नवीन साडेबारा हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
महाराष्ट्र पोलीस
आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी भरती होणार असून, लवकरात लवकर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील तरुण तरुणींना यामुळे फायदा होणार आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
Last Updated : Sep 16, 2020, 7:05 PM IST