महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे, जनावरांचा चारा अत्यावश्यक सेवेत - ब्रेक द चेन

दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे व जनावरांचा चारा व त्यांचेवर प्रक्रीया करण्यासाठी लागणा-या कच्च्या मालाची वाहतूक करणे व त्यांच्या साठवणूकीसाठी गोदामे चालविणे या बाबींचा अंतर्भाव अत्यावश्यक सेवेत करण्यात आला आहे

sunil kedar
sunil kedar

By

Published : Apr 8, 2021, 10:43 PM IST

मुंबई - ब्रेक द चेन अभियानांतर्गत पशुसंवर्धनाशी संबंधित दूध व दुग्धजन्य पदार्थ, फूड शॉप, चिकन, कोंबड्या, मटण, अंडी, मांस, मासे, जनावरांसाठी आवश्यक असणारे पशु व कुक्कुट खाद्य, चारा यांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.

गोदामे देखील अत्यावश्यक सेवेत

अत्यावश्यक सेवांमध्ये स्थानिक कार्यालयाच्या मार्फत जनसामान्यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा समाविष्ट आहेत. यात पशुसंवर्धन विभागाच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांचा समावेश होतो. तसेच सर्व प्रकारच्या कार्गो सेवांचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये आवश्यक वस्तू व सेवांकरिता वाहतूक व पुरवठा अबाधित ठेवण्यात आली आहे. यामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे व जनावरांचा चारा व त्यांचेवर प्रक्रिया करण्यासाठी लागणा-या कच्च्या मालाची वाहतूक करणे व त्यांच्या साठवणुकीसाठी गोदामे चालविणे या बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

सर्व प्रकारचे उत्पादन उद्योग राहणार सुरू

अत्यावश्यक सेवांमध्ये सर्व प्रकारचे उत्पादन उद्योग सुरु ठेवण्यात आले आहेत. यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग, डेयरी युनिट्स, पशुखाद्य व चारा प्रक्रिया युनिट्स, औषध निर्मिती कारखाने, लस निर्मिती संस्था, वैद्यकीय उपकरणे निर्मिती युनिट्स तसेच या सर्वांना सहाय्यभूत ठरतील अशा सेवा, त्यांची वाहतूक आणि त्यांचे विक्रेते यांच्या सेवा समाविष्ट आहेत. या सेवा उपलब्ध करीत असताना संबंधितांनी शासनाद्वारे तसेच स्थानिक प्रशासनाद्वारे कोव्हिड-19 प्रसार खंडीत करणे अभियान" अंतर्गत निर्गमीत केलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक असल्याचे केदार यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details