महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जोगेश्वरी येथील साहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील निलंबित 40 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी

सहाय्यक पोलीस आयुक्तपदी कार्यरत असलेल्या सुजाता पाटील यांना निलंबित करण्यात आलं आहे. सुजाता पाटील यांना 40 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. जामीनावर सुटका झाल्यानंतर शासनाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

jogeshwari-assistant-commissioner-of-police-sujata-patil-suspended-for-accepting-bribe-of-rs-40000
सुजाता पाटील

By

Published : Oct 30, 2021, 8:49 AM IST

मुंबई - जोगेश्वरी येथील सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना लाचखोरी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना अटक केल्यानंतर आता शासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. 40 हजार रुपयांची लाच घेताना सुजाता पाटील यांना रंगेहाथ पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुजाता पाटील यांना एसीबीकडून अटक करण्यात आली होती. अखेर आता प्रशासनाकडून सुजाता पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

लाच घेतल्याप्रकरणी सुजाता पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई
लाच घेतल्याप्रकरणी सुजाता पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई

अटकेनंतर सुजाता पाटील यांची विशेष न्यायालयाने जामीनावर सुटका केली होती. वकील नितीन सातपुते यांनी सुजाता पाटील यांची बाजू मांडत जोरदार युक्तीवाद केला होता. त्यानंतर न्यायालयाने सुजाता पाटील यांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर सुजाता पाटील यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट लिहीत संताप व्यक्त केला होता. या पोस्टमध्ये त्यांनी आपली बाजू मांडत हे प्रकरण फ्रॅब्रिकेटेड असल्याचे म्हटले होते.

काय आहे प्रकरण?


जोगेश्‍वरी येथील एका तक्रारदाराने त्याचा गाळा एका महिलेला भाडेतत्त्वावर दिला होता. 5 ऑक्टोबर रोजी तो गाळा त्यांनी भाडेकरुकडून ताब्यात घेतला होता. मात्र, भाडेकरु महिलेसह इतरांनी गाळ्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. याबाबत त्यांनी जोगेश्‍वरी पोलिसांत भाडेकरुविरुद्ध तक्रार केली होती. पण पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी एसीपी सुजाता पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मदत मागितली होती. गाळ्याचा ताबा घेतलेल्या महिलेकडून भविष्यात त्रास होऊ नये म्हणून सुजाता पाटील यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती, अशी माहिती समोर आली होती. त्यापैकी 10 हजार रुपये त्याच दिवशी घेतले होते. उर्वरित रक्कमेसाठी सुजाता पाटील त्यांच्याकडे तगादा लावत होत्या. त्यामुळे तक्रारदाराने सुजाता पाटील यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. त्यानंतर सापळा रचत सुजाता पाटील यांना अटक करण्यात आली.

हेही वाचा -अभिनेत्री जुही चावलाच्या 'या' एका चुकीमुळे आर्यन खानचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम एका रात्रीने वाढला

ABOUT THE AUTHOR

...view details