मुंबई:फिर्यादी आणि त्याच्या भावात पोलीस कारवाईची भीती दाखवून जबरदस्तीने 10 हजार रुपये उकळाल्या प्रकरणी सर जे जे मार्ग पोलीस स्टेशनमध्ये J J Marg Police Station 2 पोलिसांविरोधात काल खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज या दोन्ही पोलिसांना अटक केल्याची माहिती जे जे मार्ग पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष बोरडे यांनी सांगितले आहे.
Mumbai Crime : कुंपण शेत खातंय! खंडणी प्रकरणी 2 पोलिसांना जे जे मार्ग पोलिसांनी केली अटक - खंडणीचा गुन्हा दाखल
Mumbai Crime: फिर्यादी आणि त्याच्या भावात पोलीस कारवाईची भीती दाखवून जबरदस्तीने 10 हजार रुपये उकळाल्या प्रकरणी सर जे जे मार्ग पोलीस स्टेशनमध्ये J J Marg Police Station 2 पोलिसांविरोधात काल खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाची तक्रार दाखल जे. जे. मार्ग पोलीस स्टेशन येथे सहाय्यक फौजदार सुनील कमलाकर वर्तक (वय 57) राठी- पनवेलकर हाईट्स शांतीनगर, बदलापूर ठाणे, पोलीस शिपाई विजय सुरेश गायकवाड राठी - 205 दुसरा माळा सी विंग कुंभारवाडा खडवली पूर्व कल्याण ठाणे या 2 पोलिस अंमलदार यांच्यावर खंडणीचा भादंवि कलम 384, 341, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दुपारी 1 वाजता हेमेंद्र प्रभुदास पटेल (वय 40) यांनी पोलिस स्टेशनला या प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे.
गुन्ह्याची थोडक्यात माहिती15 ऑक्टोबरला सकाळच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा चुलत भाऊ प्रतीक पटेल असे दोघेजण जे जे जंक्शन, जे जे मार्ग मुंबई येथे आले असताना जे जे मार्ग पोलीस ठाणे मुंबई येथे नियुक्तीत असलेले पोलीस शिपाई विजय गायकवाड, सुनील वर्तक यांनी फिर्यादी आणि प्रतीक याला पोलीस कारवाईची भीती दाखवून त्यांच्याजवळून रोख रक्कम रुपये 10 हजार बळजबरी करून काढून घेतले होते.