महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वंचितसोबत सकारात्मक चर्चा होईल अन् ते आमच्यासोबत येतील - जयंत पाटील

आम्ही समविचारी आणि लोकशाही मुल्ये जपणाऱ्या पक्ष, संघटनांसोबत आघाडी केली आहे. यामुळे असेच विचार असलेल्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभेच्या निवडणुकीत आमच्यासोबत यावे अशी आमची भूमिका आहे. येत्या काळात वंचित बहुजन आघाडीसोबत सकारात्मक चर्चा होईल आणि ते आमच्या सोबत येतील अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

By

Published : Jul 23, 2019, 11:14 PM IST

वंचित सोबत सकारात्मक चर्चा होईल आणि ते आमच्या सोबत येतील - जयंत पाटील

मुंबई - भाजपा सरकारला सत्तेतून घालविण्यासाठी आम्ही समविचारी आणि लोकशाही मुल्ये जपणाऱ्या पक्ष, संघटनांसोबत आघाडी केली आहे. यामुळे असेच विचार असलेल्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभेच्या निवडणुकीत आमच्यासोबत यावे अशी आमची भूमिका आहे. येत्या काळात वंचित बहुजन आघाडीसोबत सकारात्मक चर्चा होईल आणि ते आमच्या सोबत येतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

वंचित बहुजन आघाडीसोबत सकारात्मक चर्चा होईल आणि ते आमच्या सोबत येतील

राज्यातील भाजपा शिवसेना सरकारला सत्तेतून घालविण्यासाठी आम्ही समविचारी आणि लोकशाही मुल्ये जपणाऱ्या पक्ष, संघटनांसोबत आघाडी केली आहे. आम्ही आघाडीकडून एक पत्र वंचितला पाठवले होते, त्यांचे उत्तर आले आहे. त्यात त्यांनी दोन मुद्दे उपस्थित केले असून त्यावर लवकरच तोडगा निघेल. त्यामुळे येत्या काळात वंचित बहुजन आघाडीसोबत सकारात्मक चर्चा होईल आणि ते आमच्या सोबत येतील.

भाजपमधील अनेक लोक आम्हाला भेटायला येत आहेत

भाजप राज्यात पाच वर्षे पूर्ण करूनही त्यांना आमच्या पक्षातून लोक यावेत म्हणून वाट पाहतात, मात्र त्यांच्यातील जे निष्ठावंत आहेत, त्यांच्यावर अन्याय होत असल्याने त्यांच्यातील निष्ठावंतांनी आता आम्हाला भेटायला सुरू केले आहे. अनेक लोक आम्हाला भेटायला येत असल्याचा दावाही पाटील यांनी केला.

सरकारने क्षणाचाही विलंब न लावता हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी

सेना-भाजपाचे लोक राज्यात शेतकरी संकटात असताना यात्रा काढून आपला प्रचार करत निघाले आहेत. दुबार पेरणीसाठी आम्ही मागील वर्षी मागणी केली होती, यंदा तर भयंकर स्थिती बनली आहे. त्यामुळे सरकारने क्षणाचाही विलंब न लावता हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत आणि दुपार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावीत. अशी मागणी पाटील यांनी केली.

निवडून येणाऱ्या उमेदवारांना उभे करणे हेच आमचे धोरण

विधानसभेसाठी जागा वाटपाचा विषय लवकरच आम्ही सोडवतोय. जागा वाटपासाठी निवडून येणाऱ्या उमेदवारांना उभे करणे हेच आमचे धोरण ठरले असल्याचे पाटील म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details