मुंबई - कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना उपनगरातील खासगी रुग्णालये बंद होत आहेत. यामुळे इतर आजार झालेल्या रुग्णांनी पालिकेच्या घाटकोपरमधील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात गर्दी केली आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढवण्याची शक्यता आहे.
राज्यातील अनेक खासगी रुग्णालये बंद; नागरिकांची सरकारी रुग्णालयात गर्दी - private hospitals in mumbai
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना उपनगरातील खासगी रुग्णालये बंद होत आहेत. यामुळे सरकारी रुग्णालयांवरील ताण वाढला आहे.
अनेक ठिकाणी खासगी दवाखाने व रुग्णालये बंद ठेवण्यात आली आहेत. राज्य सरकारने खासगी दवाखाने तसेच रुग्णालये चालू करण्याचे आदेश दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने सरकारी रुग्णालयांवरचा ताण वाढला आहे. घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात ओपीडी रुग्णाची संख्या जास्त असल्याने 'सोशल डिस्टन्स'चे तीन तेरा झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
या परिसरातील खासगी रुग्णालये सुरू झाल्यास सरकारी रुग्णालयातील संख्या कमी होईल, असे रुग्णांनी मत व्यक्त केले आहे.