मुंबई -महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणारे एकनाथ शिंदे ( Eknath Shinde arrives in Guwahati ) यांच्या रणनीतीने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील पोलीस विभागाचे इंटेलिजन्स ब्युरो फेल ( Thackeray government home department fails allegations ) झाल्याचे वास्तव समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनावेळी देखील अशाच प्रकारचे अपयश ( Eknath shinde rebel shivsena mla ) समोर आले होते. त्यानंतर आता राज्यात भूकंप घडवणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाची खबर इंटेलिजन्स ब्युरोला देखील नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे, गृहखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा -बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही सोडलेली नाही आणि सोडणार नाही : एकनाथ शिंदे
पोलीस बंदोबस्तात एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार मुंबई सूरत रस्त्याने गुजरातपर्यंत पोहचले असल्याची माहिती समोर आली आहे. तलासरीपर्यंत महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा एकनाथ शिंदे यांना होती. त्यानंतर गुजरात पोलिसांच्या सुरक्षेत एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार सूरतला रवाला झाले. विशेष म्हणजे, इतकी मोठी घडामोड घडत असताना याची कल्पना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आली नव्हती. त्यामुळे, गृहखात्याच्या कारभारावर आता प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यात सरकार अस्थिर करण्यासाठी किंवा सत्ता उलथवण्यासाठी काही प्रयत्न तर सुरू नाहीत ना, यावर गुप्तचर यंत्रणा लक्ष ठेवून असते, अशा काही हालचाली दिसल्यास या यंत्रणेकडून राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना तशी माहिती दिली जाते. मात्र, जवळपास 20 आमदारांसह शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे हे मुंबई सोडून सुरतला गेले तरी शिवसेना नेतृत्व याबाबत काही तास अनभिज्ञच होते, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे, गुप्तचर यंत्रणेच्या अपयशावर आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.