मुंबई :हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांड प्रकरणात ( Sheena Bora Case ) मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला ( Indrani Mukerjea On Supreme Court ) आहे. या अर्जावर सोमवारी ( 14 फेब्रुवारी ) सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळून लावल्यानंतर इंद्राणी मुखर्जीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 2017 पासून सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने 6 वेळा तीचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
मागील महिन्यात इंद्राणी मुखर्जीची वकिल सना खानने सांगितले होते की, इंद्राणीने 27 नोव्हेंबर रोजी सीबीआय संचालकांना पत्र लिहले. पत्रात, श्रीनगरमध्ये सुट्टीवर असताना इंद्राणीची जेलमधील एक महिला कैद्याने शिनाला जिवंत पाहिले असल्याचा दावा केला होता. संचालकांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय एजन्सीने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी इंद्राणीने केली होती.
काय आहे प्रकरण
इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. ज्यात प्रथम तिला पतीपासून मुलगी झाली. तिचे नाव शीना बोरा होते. इंद्राणी मुखर्जीचा मुलगा आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितले जाते. यामुळे इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली. शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती.
2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर इंद्राणी शिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. तपासानुसार, शीनाच्या राहुलसोबतच्या संबंधांना इंद्राणीचा विरोध होता. याशिवाय आर्थिक वाद हत्येमागील संभाव्य कारण होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद आहे.
हेही वाचा -Chandrakant Khaire Vs Ambadas Danve : माझी अन् दानवेंची बरोबरी होत नाही; मी राज्यातील 13 प्रमुख नेत्यांपैकी एक -खैरे