मुंबई- देशातील कोरोना रुग्णसंख्येत काहीअंशी घसरण झाली ( India corona update ) आहे. २४ तासात आढळणाऱ्या रुग्णांची संख्या २० हजारांहून कमी झाली आहे. देशात २४ तासांत १९,६७३ रुग्ण आढळले ( New corona cases in India ) आहेत.
मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली ( Mumbai corona update ) होती. जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. आज २८६ रुग्णांची तर १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या १७८ बेडवर रुग्ण असल्याची माहिती ( Maharashtra corona update ) पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
२८६ नवे रुग्ण -मुंबईत गेल्या २४ तासात ८ हजार ०६१ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २८६ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. आज १ मृत्यूंची नोंद झाली आहे. २६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २४ हजार ४९१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३ हजार ०२५ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ८१७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३११६ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२२ टक्के इतका आहे.