महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Coronavirus Update: कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढला! आता नवीन व्हेरिएंटने वाढवलं टेन्शन - कोरोना

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाचे ( Coronavirus )सक्रिय रुग्ण 1,30,713 वर पोहोचले आहेत. कालच्या तुलनेत देशात कोरोनाच्या ( corona ) प्रकरणांमध्ये थोडीशी घट झाली आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Jul 11, 2022, 9:48 AM IST

मुंबई -सध्या भारतात कोरोनाच्या प्रसाराने पुन्हा जोर पकडला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोविड-19 चे एकूण 16,678 नवीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, या धोकादायक व्हायरसमुळे 26 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,36,22,651 झाली आहे. (Coronavirus Update).

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार - देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 1,28,690 वर पोहोचले आहेत. कालच्या तुलनेत देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये थोडीशी घट झाली आहे. शनिवारी देशात 18,840 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

दिल्लीच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार -राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 544 नवीन रुग्ण आढळले असून आणखी 2 रुग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात कोरोनाचे 2760 नवीन रुग्ण एका दिवसात आढळले आहेत. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे (Corona Cases in Maharashtra). दोन्ही राज्यांच्या आरोग्य विभागाकडून कोरोना संसर्गाबाबत माहिती देण्यात आली. दिल्लीच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीत संसर्गाची 500 ते 600 प्रकरणे समोर आली आहेत.

दिल्लीमध्ये ओमिक्रॉनच्या अधिक संसर्गजन्य उपप्रकार -दरम्यान, डब्ल्यूएचओने म्हटलं आहे की, भारतात कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराचा BA.2.75 हा नवीन उप-प्रकार आढळून आला आहे. दिल्लीमध्ये ओमिक्रॉनच्या अधिक संसर्गजन्य उपप्रकार BA-4 आणि BA.5 ची प्रकरणं आढळून आली आहेत. परंतु तज्ञांनी म्हटलं आहे की घाबरण्याची गरज नाही कारण या उपप्रकारामुळे गंभीर संक्रमण होत नाही. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतातील लस कव्हरेज 198 कोटींवर पोहोचले आहे.

५.२५ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह - मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात १० हजार ०९३ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ५३० नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात ५.२५ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. ९७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख १७ हजार ८९७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ९३ हजार ८६३ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४ हजार ४२७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १०९८ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०६१ टक्के इतका आहे.

हेही वाचा -Mumbai Corona Update : मुंबईत रविवारी ३९९ रुग्णांची नोंद, शून्य मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details