महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Corona : चिंताजनक.. राज्यात रुग्णसंख्या व मृत्यूदरात वाढ, ८१५९ नवीन रुग्ण तर १६५ रुग्णांचा मृत्यू - कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्र

राज्यात शुक्रवारी कोरोना रुग्णांची संख्येत वाढ दिसून आली. आज दिवसभरात ८,१५९ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. १६५ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे.

corona cases in Maharashatra
corona cases in Maharashatra

By

Published : Jul 21, 2021, 7:58 PM IST

Updated : Jul 21, 2021, 8:16 PM IST

मुंबई -राज्यात शुक्रवारी कोरोना रुग्णांची संख्येत वाढ दिसून आली. आज दिवसभरात ८,१५९ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सोमवारी मृत्यूच्या संख्येत घट होऊन ६६ मृत्यूची नोंद झाली होती. मंगळवारी त्यात वाढ होऊन १४७ मृत्यूची नोंद झाली, आज त्यात किंचित वाढ होऊन १६५ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात मृत्यूदर २.०९ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

आज ७,८३९ रुग्णांना डिस्चार्ज -

राज्यात आज ७८३९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,०८,७५० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.३३ टक्के एवढे
झाले आहे. आज राज्यात ८,१५९ हजार नवीन रुग्णाांचे निदान झाले असून १६५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३०,९१८ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६०,६८,४३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,३७,७५५ (१३.५४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,५१,५२१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,७९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९४,७४५ सक्रीय रुग्ण आहेत.

..या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई - ४३०
रायगड -३२४
अहमदनगर - ५५९
पुणे - ८२८
पुणे पालिका - ३६८
सोलापूर - ४४३
सातारा - ९५९
कोल्हापूर - ९८६
सांगली - ८६१
रत्नागिरी - २१०

जुलैमध्ये आतापर्यंतची दैनंदिन रुग्णसंख्या

21 जुलै - 8159 नवे रुग्ण
20 जुलै - 6910 नवे रुग्ण
19 जुलै - 6017 नवे रुग्ण
18 जुलै - 9000 नवे रुग्ण
17 जुलै - 8172 नवे रुग्ण
16 जुलै - 7761 नवे रुग्ण
15 जुलै - 8010 नवे रुग्ण
14 जुलै - 8602 नवे रुग्ण
13 जुलै - 7243 नवे रुग्ण
12 जुलै - 7603 नवे रुग्ण
11 जुलै - 8535 नवे रुग्ण
10 जुलै - 8296 नवे रुग्ण
9 जुलै - 8992 नवे रुग्ण
7 जुलै - 9558 नवे रुग्ण
5 जुलै - 6740 नवे रुग्ण
4 जुलै - 9336 नवे रुग्ण
3 जुलै - 9489 नवे रुग्ण
2 जुलै - 8753 नवे रुग्ण
1 जुलै - 9195 नवे रुग्ण

Last Updated : Jul 21, 2021, 8:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details