नवी मुंबई: नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतआज शंभर जुड्यांप्रमाणे पालकच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. मुळ्याच्या दरात २००, तर कोथिंबीरच्या दरात २४०० रुपयांनी वाढ झाली आहे. फरसबीच्या दरात पाचशे ते हजार रुपयांनी वाढ झाली आहे. भेंडीच्या किमतीत दीड हजार रुपयांनी वाढ झाली आहे, तर इतर भाज्यांच्या किमती स्थिर आहेत.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० ते ४००० रुपये, भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ६५०० ते ७५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ४००० ते ५००० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे ७००० ते ८००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ६५०० ते ७५००, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ५३०० ते ६८०० रुपये
फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : कैरी प्रति १०० किलोप्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० ते २६०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १८०० ते २००० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे ४००० ते ४४०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे ३००० ते ३५०० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे १८०० ते २००० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे ३७०० ते ४००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे ४५०० ते ६००० रुपये, पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे ३००० ते ३५०० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३६०० ते ४४०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ३६०० ते ४४०० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे ५००० ते ६००० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे २३०० ते २८०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १८०० ते २००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १२०० ते १६०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ६५०० ते ९,००० रुपये