महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

तिने कपडे काढताच तो पघळला; सावधान! व्हिडिओ कॉलवर सेक्स करताना 100 वेळा करा विचार

पुणे शहरात मागच्या आठवड्यात सेक्सटॉर्शनच्या ( Sextortion ) त्रासाला कंटाळून दोन युवकांनी आत्महत्या ( Suicide due to sextortion ) केल्याची धक्कादायक घटना घडली असताना आत्ता अशा सेक्सटॉर्शनच्या घटना दिवसेंदिवस वाढत ( Increase in the incidence of sextortion ) चालले आहे.

Sextortion
पुण्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ

By

Published : Oct 14, 2022, 5:52 PM IST

पुणे -पुणे शहरात मागच्या आठवड्यात सेक्सटॉर्शनच्या ( Sextortion ) त्रासाला कंटाळून दोन युवकांनी आत्महत्या ( Suicide due to sextortion ) केल्याची धक्कादायक घटना घडली असताना आत्ता अशा सेक्सटॉर्शनच्या घटना दिवसेंदिवस वाढत ( Increase in the incidence of sextortion ) चालले आहे. वर्षभरात पुणे सायबर पोलीस स्टेशन ( Pune Cyber Police Station ) येथे सेक्सटॉर्शनचे तब्बल 1400 अर्ज आले आहे. तर सेक्सटॉर्शन बाबत एक गुन्हा दाखल आहे. अशी धक्कादायक माहिती सेक्सटॉर्शन बाबत समोर आली आहे.

पुण्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ

कशी होते फसवणूक -साधारणतः हा आपल्याला आपल्या व्हॉट्सॲपवर एका नंबरवरून सुंदर मुलीचं फोटो येतो. त्यांनतर हळूहळू ओळख केली जाते. जस जशी ओळख निर्माण होते तसच समोरून आग्रह केला जातो की व्हिडियो कॉल वर बोलूया. त्यानंतर जेव्हा व्हिडियो कॉल केला जातो. तेव्हा समोर असलेली मुलगी नग्न होते. ती आपल्याला ही न्यूड होण्याबाबत आग्रह करते.चेहरा कॅपचर करण्यासाठी दोन मिनिटांचा व्हिडियो कॉल केला जातो. लगेच व्हॉट्सॲपवर त्या व्हिडियो कॉल चा व्हिडियो येतो तेथून धमक्यांना सुरवात होते. पहिल्यांदा अशी धमकी दिली जाते की जर आपण पैसे नाही दिले तर मी तक्रार दाखल करेल अन्यथा सोशल मीडियावर व्हायरल करेल.अशी धमकी दिली जाते.याच धमकीला तरुण बळी पडतात. जर पैसे दिले गेले नाही तर सोशल मीडियावर व्हायरल केलं जातं. बदनामी होऊ नये म्हणून तरुण टोकाचं पाऊल उचलतात.

पुणे सायबर पोलिसांकडे सेक्सटॉर्शन चे 1400 अर्ज - पुणे सायबर पोलिसांकडे सेक्सटॉर्शन चे 1400 हून अधिक अर्ज आले आहेत.पोलीस याचा तपास करत आहे. आमच्याकडे अर्ज घेऊन आलेल्या व्यक्तीकडून पूर्ण माहिती घेतली जाते. त्याला समजावून सांगितलं जातं की कोणत्याही प्रकारचे पैसे भरू नये. पॅनिक होऊ नये. कोणताही टोकाचं पाऊल उचलू नये अस सांगितल जात. जर अर्जदाराने पैसे भरले असेल तर बँक डिटेल घेऊन तशी चौकशी केली जाते. तसेच व्हॉट्सॲप वरून माहिती घेऊन पुढील तपास केला जात आहे. अशी माहिती पुणे सायबर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मिनल तुपे पाटील यांनी दिली आहे.

पोलिसांकडून आवाहन -पुणे सायबर पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे की अनोळखी व्यक्ती जर कोणीही व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियावरून बोलत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करावे. तसेच जर संशय आला तर लगेच संबंधित अनोळखी व्यक्तीला ब्लॉक करा. तसेच घाबरून जाऊ नका. कोणीही अधिकृत सोशल मीडियावर तुमचं व्हिडियो व्हायरल करू शकत नाही. तसेच जर कोणीही धमक्या दिल्या तर तात्काळ संबंधित पोलीस स्टेशन किंवा सायबर पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दाखल करा. कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका अस आवाहन देखील यावेळी पोलीस निरीक्षक मिनल तुपे पाटील यांनी केलं आहे.

दत्तवाडीत एका तरुणाकडून आत्महत्या...पुण्यातील दत्तवाडी भागात राहणाऱ्या 19 वर्षीय शंतनू वाडकर या तरुणाच प्रीत यादव या तरुणी सोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली असताना दोघांमध्ये ओळख झाल्यावर त्याने तिला अर्धनग्न फोटो पाठवले.त्यानंतर त्या तरुणीने पैसे दे अन्यथा सोशल मीडियावर फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली.आणि या सततच्या त्रासाला कंटाळून या 19 वर्षीय शंतनू वाडकर या तरुणाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.दत्तवाडी परिसरातील अनंत कुमार सोसायटीमध्ये शंतनू वाडकर हा 19 वर्षीय तरुण राहण्यास होता.तो सोशल मीडिया सक्रिय होता. शंतनू याची इन्स्टाग्रामवर प्रीत यादव असे आयडी असलेल्या तरुणीशी ओळख झाली. तर त्याच दरम्यान प्रीत यादव हिने शंतनूला अर्धनग्न फोटो मागितल्यावर त्याने तिला शेयर केले. त्यानंतर मला पैसे दे,अन्यथा तुझे अर्धनग्न फोटो व्हायरल करेल,अशी धमकी प्रीत यादव हिने दिली.त्यावर त्याने 4 हजार 500 रुपये ऑनलाईन दिले. त्यानंतर देखील सतत पैसे मागवू लागल्याने या सततच्या त्रासाला कंटाळून शंतनूने 28 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास राहत्या असलेल्या इमारतीवरून उडी मारली. त्यानंतर त्याला तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल केले असता,डॉक्टरांनी मृत घोषित केले.


30 सप्टेंबरला धनकवडी परिसरात अशीच घडली होती घटना... पुण्यातील धनकवडी येथे ऑनलाइन ओळख झालेल्या तरुणीने तरुणाचा नग्नावस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत सातत्याने खंडणीची मागणी केल्याने अमोल राजू गायकवाड (रा. तानाजी नगर, धनकवडी) या तरुणाने ३० सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दोन अज्ञात मोबाईल धारकांकडून अमोल गायकवाड यांच्या व्हाट्सअपवर मेसेज येण्यास सुरुवात झाली. मेसेज आलेल्या क्रमांकावर एका महिलेचा डीपी होता. त्यानंतर या महिलेने तरुणासोबत चॅटिंग सुरू केले.त्यानंतर संबंधित तरुणास न्यूड कॉल केले. त्यानंतर तरुणास ते व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या महिलेने त्याच्याकडे पैशांची मागणी करून वेळोवेळी पैसे घेऊन मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्या तरुणाला याचा त्रास होऊ लागला. अखेर अमोलने तिला संदेश पाठविला की, 'मैं सुसाईड करा रहा हूँ'. त्यावर तिने 'करो सुसाईड, मैं सोशल मीडियापर व्हीडीओ व्हायरल कर रही हूँ', अशी धमकी देऊन पैशांची मागणी केली. तरुणीच्या धमक्यांमुळे अमोल ने ३० सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details