महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

समीर वानखेडे अनुसूचित जातीचेच!, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या उपाध्यक्षांची प्रतिक्रिया - Nawab Malik

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर त्यांच्या जाती बाबत आरोप केले होते. या आरोपावरून आज (शनिवारी) त्यांनी आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हालदार यांची भेट घेतली होती. यावेळी आयोगाने एखाद्या अधिकाऱ्यावर जाती संदर्भात अशी कोणी वैयक्तिक टीका केली तर ती सहन केली जाणार नाही असे म्हणत राज्य सरकारला यासंदर्भात दहा दिवसांमध्ये आपले मत आयोगासमोर मांडण्याचे सांगितले आहे.

In the case of Sameer Wankhede, the state government should submit its vote before the Scheduled Castes Commission within ten days
समीर वानखेडे अनुसूचित जातीचेच - अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर

By

Published : Oct 30, 2021, 9:37 PM IST

Updated : Oct 30, 2021, 10:39 PM IST

मुंबई -नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबई झोन डायरेक्टर समीर वानखेडे यांनी शनिवारी मुंबईत अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. त्यांनी त्यांच्याकडे एक तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यांनी स्वतःवरील धर्मांतराच्या आरोपांवर आपले मत उपाध्यक्षाना सांगितले. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर धर्मांतराच्या विरोधात आरोप लावले होते त्यासंदर्भात समीर वानखडे यांनी आयोगापुढे आपली बाजू मांडली आहे.

समीर वानखेडे अनुसूचित जातीचेच - अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर

'समीर वानखेडे अनुसूचित जातीचेच'

नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर त्यांच्या जाती बाबत आरोप केले होते. या आरोपावरून आज (शनिवारी) त्यांनी आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हालदार यांची भेट घेतली होती. त्यानंतर उपाध्याक्ष हलदर यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत स्पष्टीकरण देत आठ पानी अर्ज दाखल केला आहे. यामध्ये त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे. यावरून मला असे वाटते की समीर वानखेडे हे अनुसूचित जातीचे आहेत. ते कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर वरती आलेले आहेत. त्यानी धर्मांतर केल्याचा आरोप नाकारला आहे. असे ते म्हणाले. तसेच महाराष्ट्र सरकारला या प्रकरणात तपास करण्यासाठी दिलेले दिवस अजून पूर्ण झालेले नाहीत त्यामुळे आम्ही दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकूणच आम्ही योग्य तो निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. तसेच यावेळी आयोगाने एखाद्या अधिकाऱ्यावर जाती संदर्भात अशी कोणी वैयक्तिक टीका केली तर ती सहन केली जाणार नाही असे म्हणत राज्य सरकारला यासंदर्भात दहा दिवसांमध्ये आपले मत आयोगासमोर मांडण्याचे सांगितले आहे.

हिंदू असते तर निकाह झालाच नसता -

समीर वानखेडे यांचे पहिले लग्न डॉक्टर शबाना कुरेशी यांच्यासोबत झाले. हे लग्न मुस्लीम पद्धतीने झाले. मात्र, आईच्या आग्रहाखातर मुस्लीम पद्धतीने विवाह केल्याचा दावा समीर वानखेडेंनी केला असताना त्यांचे लग्न लावणाऱ्या काझींनी मात्र वेगळाच दावा केला आहे. "जर समीर वानखेडे हिंदू असते, तर त्यांचा निकाह झालाच नसता", अशी भूमिका त्यांचे लग्न लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी घेतली आहे. 'जर ते हिंदू असते, तर निकाहच झाला नसता. सगळेच मुसलमान होते. समीर, शबाना त्यांचे वडील दाऊद आणि मुलीचे वडील जाहीद हे देखील मुसलमानच होते. मुसलमान नसते, तर हे नातेच झाले नसते, काझीने हा निकाह वाचला नसता आणि २ हजार लोकांना दावत देखील झाली नसती असे' ते म्हणाले आहेत.

नवाब मलिक यांचे आरोप काय -

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला रोज नवीन वळणं लागत आहे. दररोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता वेगळे वळण मिळाले. अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे याचा एक फोटो ट्वीट करीत गैाप्यस्फोट केला आहे. नवाब मलिक यांनी आपल्या ट्वीटर हॅडलवरुन समीर वानखेडेंचा फोटो ट्वीट केला होता. या फोटो एक महिला व अन्य जण दिसत होते.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंबाबतचे दोन ट्विट केले होते. पहिल्या ट्विटमध्ये मलिक यांनी वानखेडे यांचा सिंगल फोटो पोस्ट केला. हा फोटो अत्यंत जुना होता. अगदी तरुण वयातील हा फोटो आहे. त्यावर मलिक यांनी पैचान कौन? असा सवाल केला होता.

हेही वाचा - समीर वानखेडे मुस्लिमच; निकाह पढवणाऱ्या मौलानांचा दावा

Last Updated : Oct 30, 2021, 10:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details