महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Omicron In Mumbai - मुंबईत ओमायक्रॉनचे ३३ नवे रुग्ण, रुग्णांचा आकडा पोहोचला ११८ वर - जीनोम सिक्वेंसिंग चाचणी

ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईत परदेशात प्रवास केलेल्या ३३ प्रवाशांना ओमायक्रॉन ( 33 Traveler Found Omicron Positive Mumbai ) झाल्याचे चाचण्यांतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या ( Omicron In Mumbai ) आता ११८ झाली आहे.

Omicron
Omicron

By

Published : Dec 29, 2021, 10:36 PM IST

Updated : Dec 29, 2021, 11:01 PM IST

मुंबई - मुंबईत एकीकडे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत ( Covid Spread In Mumbai ) असताना नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत ( Omicron In Mumbai ) आहेत. मुंबईत परदेश प्रवास केलेले ३३ प्रवासी विमानतळावरील चाचण्यांमध्ये ओमायक्रॉन पॉजिटिव्ह आढळून आले ( 33 Traveler Found Omicron Positive Mumbai ) आहेत. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ११८ झाली आहे. त्यापैकी ६५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून ( BMC Health Department ) देण्यात आली आहे.

रुग्णांचा आकडा ११८ वर

मुंबई विमानतळावर ( Mumbai Airport ) अतिजोखमीच्या देशातून १३ हजार ३४३ प्रवासी आले. त्यामधील ७४ प्रवासी विमानतळावरच्या चाचणीत कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. १ नोव्हेंबरपासून परदेश प्रवास केलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यात १७८ प्रवासी कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना बाधितांच्या अतिजोखमीच्या सहवासातील २७ रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना पॉजिटीव्ह प्रवाशांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे ( National Institute of Virology Pune ) येथे जीनोम सिक्वेंसिंग चाचणीसाठी ( Genome sequencing test ) पाठविण्यात आले. त्यात आतापर्यंत ११८ (७५ पुरुष, ४३ स्त्री) जणांना ओमायक्रॉन कोविड विषाणू प्रकाराची बाधा झाल्याचा अहवाल महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे. एकूण ११८ पैकी ७५ रुग्ण मुंबईबाहेरील आहेत.

नागरिकांनी भीती बाळगू नये

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत नागरिकांनी भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात मास्क घालणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर पाळणे, गर्दीत न जाणे या कोविड नियमांचे पालन करावे. नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनी त्याची माहिती स्थानिक आरोग्य विभागास द्यावी, असे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे.

हेही वाचा - राज्यात आज 3 हजार 900 तर, मुंबईत 2 हजार 510 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Last Updated : Dec 29, 2021, 11:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details