Silver Oak Attack : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बंगल्यावर महत्त्वाची बैठक; वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बंगल्यावर महत्त्वाची बैठक सुरू आहे. बैठकीत पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, राज्याचे महाधिवक्ते आणि विशेष सरकारी वकील उपस्थित असल्याची माहिती आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी या हल्ल्याचे खापर पोलिसांवर फोडल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बंगल्यावर महत्त्वाची बैठक सुरू आहे. बैठकीत पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, राज्याचे महाधिवक्ते आणि विशेष सरकारी वकील उपस्थित असल्याची माहिती आहे.