महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईतील गॅस गळती संदर्भात आज महत्त्वपूर्ण बैठक

गॅस गळती संबंधीत सर्व अॅथोरिटीची शुक्रवारी बैठक होणार आहे. तत्पुर्वी कोणत्याही प्रकारची गॅस गळती झाल्याचे समोर आले नाही.

गॅस गळती

By

Published : Sep 20, 2019, 1:01 PM IST

मुंबई- शहरात गुरुवारी अचानक गॅस गळती झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुंबई अग्निशमन दलासह सर्व गॅस कंपन्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. गॅस गळती संबंधीत सर्व अॅथोरिटीची शुक्रवारी बैठक होणार आहे. तत्पुर्वी कोणत्याही प्रकारची गॅस गळती झाल्याचे समोर आले नाही.

चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, चांदीवाली, पवई, घाटकोपर, अंधेरी आणि बोरिवली नॅशनल पार्क आदी परिसरातील हवेत गॅसचा दुर्गंध येऊ लागला. त्यामुळे नागरिकांनी मुंबई पोलीस तसेच अग्निशमन दलाकडे तक्रार केली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या विविध ठिकाणी पाठवून माहिती घेण्यात आली. तसेच गॅस कंपन्यांना देखील सावधानतेचा इशारा देण्यात आला. शिवाय हवेमध्ये गॅसचा दुर्गंध पसरल्याने महाराष्ट्र प्रदूषण मंडळालाही यामागील करण शोधण्याचे आदेश देण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details