महाराष्ट्र

maharashtra

मुंबईत विजेच्या कडकडासह पाऊस; अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज

By

Published : Oct 15, 2020, 2:05 AM IST

Updated : Oct 15, 2020, 2:11 AM IST

मुंबईत विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह मध्यरात्री पावसाला सुरुवात झाली. असे असले तरी मुसळधार पावसाची नोंद झालेली नाही.

संग्रहित
संग्रहित

मुंबई- परतीच्या पावसाने पुणे, सोलापूर इतर शहरांना झोडपल्यानंतर मुंबईकरांची चिंता वाढली आहे. रात्री 12 वाजल्यापासून मुंबईत विजेचा कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

मुंबईत कुठेही अद्याप पाणी साचल्याची नोंद नाही. शहरात काही ठिकाणी पावसाचा जोर मध्यरात्रीनंतर वाढला आहे.

रात्री 8 वाजल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत शहर विभागात 6.37 मिलिमीटर, पूर्व उपनगरात 6.23 मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात 7.87 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत वीजा चमकत असल्या तरी मुसळधार पावसाची नोंद झालेली नाही.

Last Updated : Oct 15, 2020, 2:11 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details