मुंबई -अभिजित देशपांडे यांची महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या सचिव पदी करण्यात आलेली नियुक्ती अवैध ( Abhijit Deshapande Illegal Appointment MERC ) आहे. त्यामुळे सदरची नियुक्ती त्वरीत रद्द करण्यात यावी. त्या जागी पात्र आयएएस सचिव किंवा समकक्ष अधिकाऱ्याची निवड करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केली ( Maharashtra Electricity Conmsumer Association Demand ) आहे.
महावितरणचे माजी संचालक अभिजित देशपांडे यांनी आयोगाचे सचिव म्हणून सूत्रे स्वीकारली आहे. तेव्हापासून शासन, आयोग, महावितरण या सर्व ठिकाणी ग्राहक व ग्राहक प्रतिनिधी यांच्याविरोधी वातावरण तयार करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे ग्राहकांचा व ग्राहक प्रतिनिधींचा महावितरणवरील दबाव कमी झाला. परिणामी महावितरणमधील भ्रष्टाचार व मनमानी बेकायदेशीर कारभार यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे, असा आरोपही महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केला आहे.