महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई-रायगडच्या किनारपट्टीलगतच्या भागाला वाढला पुराचा धोका; 17 वर्षात 110 टक्क्यांनी बांधकामात वाढ - construction at coastal in Raigad

आयआयटीच्या अभ्यासानुसार 2002 ते 20919 दरम्यान किनारपट्टीलगतच्या काही भागातील बांधकामात तब्बल 110 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. या वाढत्या बांधकामामुळे भविष्यात मुंबई आणि रायगड किनारपट्टीलगतच्या भागाला पुराचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

समुद्र किनारपट्टी
समुद्र किनारपट्टी

By

Published : Oct 22, 2020, 7:07 PM IST

मुंबई - रायगड आणि मुंबई किनारपट्टीलगतच्या बांधकामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. किनारपट्टीलगत मागील 17 वर्षात मोठ्या संख्येने बांधकामात प्रचंड वाढ झाली आहे. आयआयटी मुंबईच्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे.

आयआयटीच्या अभ्यासानुसार 2002 ते 20919 दरम्यान किनारपट्टीलगतच्या काही भागातील बांधकामात तब्बल 110 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. या वाढत्या बांधकामामुळे भविष्यात मुंबई आणि रायगड किनारपट्टीलगतच्या भागाला पुराचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

उपग्रहाचे छायाचित्र

आयआयटी मुंबईतील प्रा. पेन्नन चिन्नास्वामी आणि आशनी पारीख यांनी 2002 ते 2019 पर्यंत किनारपट्टीलगत बदल आणि किनारपट्टीलगतच्या बांधकामाचा अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार किनारपट्टीलगत 17 वर्षात मोठ्या प्रमाणावर बांधकाम झाल्याची माहिती प्रा. चिन्नस्वामी यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे. या अभ्यासाठी सॅटलाईट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या अभ्यासाची अद्याप पडताळणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे यात काही प्रमाणात त्रुटी असू शकतात, असेही त्यांनी सांगितले आहे.

समुद्र किनारपट्टी

दरम्यान, 21 व्या शतकातील वाढते तापमान आणि पावसाळ्यात होणारी हानी यामुळे मुंबई शहराला मोठा फटका बसणार आहे. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे, 2050 पर्यंत मुंबई अरबी समुद्रात बुडेल, अशी माहिती क्लायमेट सेंट्रलने गतवर्षी दिली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details