मुंबई- ह्रदयविकाराच्या रुग्णांवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक असते. मात्र, बऱ्यावेळा ते शक्य होत नाही. परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. याच अडचणीवर मुंबई आयआयटीतील संशोधकांनी उपाय शोधला आहे. अशा रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई आयआयटीत बायो-वाईटेल नावाची प्रणाली शोधली आहे.
आता ह्रदयरोगी रुग्णांवर लक्ष ठेवणे होणार सोपे ह्रदयविकार असलेल्या रुग्णांवर सतत लक्ष ठेवण्यासाठी वायरलेस, विश्वासू आणि कमी खर्चातून लो-पॉवर हेल्थ मॉनिटरिंग प्रणाली विकसित केली आहे. यात ऑक्सिजनची पातळी आणि हृदयाचा विद्युत सिग्नल ही मिळणार आहे. बायो-वाईटेल नावाची ही प्रणाली आरोग्याची देखरेख करण्यासाठी टेलिमेट्रीक सिस्टममध्ये मिळवून योग्य सेन्सरला जोडलेली असते. जी वैद्यकीय उपकरणासाठी आरक्षित असलेल्या वारंवारतेमध्ये वायरलेस उपकरणाच्या जवळच्या बेस स्टेशनवर डेटा प्रसारित करते. या संशोधनासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालय भारत सरकारतर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी इलेक्ट्रोकार्डिओग्राम ( ईसीजी) आणि फोटोप्लेथिसमोग्राम (पिपीजी) चा डेटा 3 मीटरच्या अंतराने प्रसारित करून त्यांच्या प्रोटोटाइप चाचणी केली आहे. ईसीजी हृदयाच्या विद्युत सिग्नलचे मोजमाप करते. पीपीजी शरीराच्या काही भागात पल्स आणि रक्तसंक्रमण दर्शवते. बायो वाईटेल प्रणाली 401-406 मेगाहर्ट्झची वारंवारिता श्रेणीमध्ये कार्य करते. यात सुमारे तीन मीटरच्या अंतरावरून डेटा एखाद्या मोबाईल फोनवर किंवा संगणकाशी जोडलेल्या डोंगलवर प्रसारित करता येतो. अशाप्रकारे गोळा केलेल्या डेटावर इंटरनेटच्या माध्यमातून रुग्णावर दूरस्थ ठिकाणाहून देखरेख करण्यास मदत होऊ शकते.
आज उपलब्ध असलेल्या अनेक व्यवसायिक उपकरणामध्ये या डेटाचे प्रसारण करण्यासाठी ब्लूटूथचा वापर केला जातो. मात्र, अशा संशोधनांमधील किरणे शरीराला हानिकारक ठरू शकतात. तर, दुसरीकडे बायो-वाईटेल 25 पेक्षा कमी सूक्ष्म प्रवाहाचे प्रमाण कमी करते. हे पण सतत वापरताना शरीराला हानिकारक ठरते, अशी माहिती आयआयटी मुंबईचे संशोधक अभिषेक श्रीवास्तव म्हणाले.