महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

स्थिर सरकार देण्यासाठी शिवसेना समर्थ, मुख्यमंत्री आमचाच - संजय राऊत

जर सेनेने ठरवले, तर स्थिर सरकार देण्यासाठी आवश्यक तितके आमदार शिवसेना मिळवू शकते. लोकांनी ५०-५० चा फॉर्म्युला डोळ्यासमोर ठेऊन युतीला बहुमत दिले आहे. लोकांना शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा आहे. असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मुंबईमध्ये व्यक्त केले.

Shivsena-BJP tussle

By

Published : Nov 1, 2019, 10:29 AM IST

मुंबई -जर शिवसेनेने ठरवले, तर स्थिर सरकार देण्यासाठी आवश्यक तितके आमदार शिवसेना मिळवू शकते. लोकांनी ५०-५० चा फॉर्म्युला डोळ्यासमोर ठेऊन युतीला बहुमत दिले आहे. लोकांना शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा आहे. असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मुंबईमध्ये व्यक्त केले.

दरम्यान, काल संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावर बऱ्याच राजकीय चर्चांना उधाण आले होते. यावर बोलताना, शरद पवार यांच्याशी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा केल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.भाजप आणि शिवसेनामधला वाद हा विकोपाला गेला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेस विलंब होतो आहे. यादरम्यान, काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्याचेही बोलले जात आहे. या सर्व गोष्टी आणि काल झालेली राऊत-पवार भेट या पार्श्वभूमीवर, शिवसेना स्थिर सरकार देऊ शकते हे संजय राऊत यांचे वक्तव्य सूचक मानले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details