मुंबई -उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागच्या महाविकास आघाडी सरकारने विश्वास गमावला होता. राज्यपाल यांनी उद्धव ठाकरे यांना विश्वास दर्शक ठरावाला सामोरे जाण्यास सांगितले होते. त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेतली गेली व त्याच्यामध्ये औरंगाबादला, संभाजीनगर, उस्मानाबादला, धाराशिव तर नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु,ही बैठक बैकायदेशीर होती अस फडणवीस म्हणाले आहेत.( Change of Name To Aurangabad ) दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीचे दरवाजे आता सर्वसामान्य जनतेसाठी खुले केले आहेत. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मातोश्रीचे दरवाजे याआधी उघडले असते तर कदाचित ही वेळ आली नसती असा टोमणा त्यांनी मारला आहे.
मंत्रिमंडळ विस्तार लवकर - अशा पद्धतीची बैठक घेता येत नसल्याकारणाने व त्याचबरोबर या बैठकीत सुद्धा हे निर्णय घेत असताना बहुमत नसल्याकारणाने या बैठकीमध्ये सुद्धा बऱ्याच मंत्र्यांचा या निर्णयाला विरोध होता म्हणून आम्ही हा निर्णय बदलणार नसून आमचं शिंदे सरकार येणाऱ्या कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय घेतला जाईल. ( Change Of Name To Osmanabad ) आमची सुद्धा तीच इच्छा आहे, परंतु ज्यांच्याकडे अधिकार नव्हते त्यांनी असा निर्णय घेतला, तो योग्य नव्हता म्हणून हा निर्णय आम्ही नव्याने घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितल आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तारही लवकर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.
ज्यांना आरक्षण द्यायचं नाही तेच बोलतात? - ओबीसी आरक्षणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या लोकांना ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण द्यायचे नाही, ते जाणीवपूर्वक याच्यामध्ये अडथळे निर्माण करत आहेत. बांठीया आयोगाने २७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. हा अहवाल फक्त राजकीय आरक्षणासाठी असून जाणून-बुजून याच्यामध्ये अडथळे निर्माण आणून सरकारला बदनाम करण्याचे काम करत असल्याचे देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले आहे.