महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा, पीआयएल दाखल करणार - करुणा शर्मा - एसटी आंदोलन

एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Workers Strike) आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनालाही यश येईल, असा विश्वास करुणा शर्मा (Karuna Sharma on ST Strike) यांनी व्यक्त केला आहे. सध्या आझाद मैदानावर हे आंदोलन सुरू आहे.

Karuna Sharma
करुणा शर्मा

By

Published : Nov 24, 2021, 5:15 PM IST

Updated : Nov 24, 2021, 6:39 PM IST

मुंबई - मुंबईच्या आझाद मैदानात गेले दोन आठवडे एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Workers Protest in Azad Maidan) आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला माझा पाठिंबा असून शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनालाही यश येईल, असा विश्वास करुणा शर्मा (Karuna Sharma on ST Strike) यांनी व्यक्त केला आहे. तसेच याप्रकरणी मी राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री असलेले धनंजय मुंडे यांना पत्र दिले आहे. तसेच उच्च न्यायालयात पीआयएल दाखल करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

करुणा शर्मा
  • त्यांचाही विजय होईल -

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे व इतर मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात गेले दोन आठवडे एसटी कर्मचाऱयांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनकर्त्यांना आज करुणा शर्मा यांनी भेट दिली. या भेटीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना, देशात जी स्थिती आहे ती दुर्दैवी आहे. भारतातील लोक जिद्दी आहेत. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले त्यांचा मोठा विजय झाला आहे. हा एकजुटीचा ऐतिहासिक विजय आहे. राज्यातही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चालू आहे. त्यांचाही विजय होईल, असे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही महिलेला गरज पडल्यास त्या माझ्या घरी येऊन राहू शकतात. त्यांना कोणती अडचण असल्यास त्यांनी मला सांगितल्यास त्या मी सोडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

  • राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना पत्र -

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्याची मागणी केली होती. मात्र, आज ते आपल्या मागण्या विसरले आहेत. यामुळे त्यांना त्या मागण्यांची आठवण करून देण्याची जबाबदारी माझी आहे. मी राज्यपाल, मुख्यमंत्री, धनंजय मुंडे यांना पत्र दिले आहे. हात जोडून पाया पडून त्यांनी मागणी मान्य करावी, असे आवाहन करुणा शर्मा यांनी केले आहे. यांच्या मागण्या मान्य केल्या तर मत द्या असे आवाहन करण्याची गरज पडणार नाही, असे त्या म्हणाल्या.

  • पीआयएल दाखल करणार -

एसटी कर्मचारी आणि शेतकरी आदीं प्रश्नांबाबत लवकरच मी उच्च न्यायालयात एक पीआयएल टाकणार आहे. त्यात एसटी कर्मचारी आणि शेतकऱ्यांचाही मुद्दा असणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून न्याय मिळेल त्याच प्रमाणे न्यायालयाकडूनही न्याय मिळेल, असा विश्वास करुणा शर्मा यांनी व्यक्त केला आहे. तसेच येत्या २६ नोव्हेंबरला राज्यभर मंत्र्यांच्या गाड्यांचा रास्तारोको करून त्या अडवल्या जाणार आहेत. त्यात मी पण सहभागी होणार आहे, असे करुणा शर्मा यांनी सांगितले.

  • एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन -

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे व इतर मागण्यांसाठी २७ ऑक्टोबरपासून कर्मचारी काम बंद आंदोलन करत आहेत. या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरु केले आहे. गेले दोन आठवडे हे आंदोलन सुरु आहे. उच्च न्यायालयाने याबाबत एक समिती स्थापन केली आहे. याबाबत पुढील सुनावणी २० डिसेंबरला होणार आहे. सरकारने या समितीच्या अहवालाप्रमाणे निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच समितीने विलीनीकरण करण्याबाबत नकारात्मक अहवाल दिल्यास एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार देण्याचे मान्य केले आहे.

Last Updated : Nov 24, 2021, 6:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details