महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक - पत्नी काही दिवसापासून बोलत नसल्याचा राग मनात धरून पतीने केली हत्या

मुंबईतल्या पूर्व उपनगरात असलेल्या आरसीएफ पोलीस स्टेशन अंतर्गत राहुल नगरमध्ये एक पतीने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली. पत्नी आपल्याशी बोलत नसल्याचा राग मनात धरून ही हत्या केली पोलिसांनी आरोपी पती अक्षय आठवले याला अटक केली आहे.

CRIME NEWS : Husband kills wife for not speaking in mumbai
पत्नी बोलत नसल्याचा राग मनात धरून पतीने केली हत्या

By

Published : Nov 12, 2021, 4:20 AM IST

मुंबई - उपनगरांमध्ये हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. फक्त आपल्याशी काही दिवसापासून बोलत नाही या क्षुल्लक कारणामुळे एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. या प्रकरणी आरोपी अक्षय आठवले याला अटक करण्यात आली आहे.

न बोलत असल्याचा मनात राग धरुन केली हत्या -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या पूर्व उपनगरात असलेल्या आरसीएफ पोलीस स्टेशन अंतर्गत राहुल नगरमध्ये एक पतीने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली. पत्नी आपल्याशी बोलत नसल्याचा राग मनात धरून ही हत्या केली पोलिसांनी आरोपी पती अक्षय आठवले याला अटक केली आहे. मृतक महिला आकाक्षा वय 21 वर्षे ही धारावीतील एक खासगी रुग्णालयात स्वागतीका म्हणून काम करते. आरोपी अक्षय आठवले यांच्याशी 2019 मधे लग्न केले होते. त्यानंतर त्यांच्यात नेहमीच वाद होत होते म्हणून ही महिला गेल्या काही महिन्यांपासून आपल्या घरी वेगळी राहू लागली.

धारदार शस्त्राने केले सपासप वार -

अक्षय तिच्याशी नेहमी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण ती त्याच्याशी बोलत नव्हती. हा राग मनात धरून बुधवारी 10 नोव्हेंबरला ही महिला सकाळी रिक्षाने कामाला जात होती. त्यावेळी अक्षय मोटारसायकलवर आला. त्याने रिक्षा अडवली आणि हातातल्या धारदार शस्त्राने तिच्यावर वार केले. तिला जखमी अवस्थेत सायनच्या टिळक रुग्णालयात उपचारासाठी भरती केले पण तत्पूर्वी तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच आरोपीला अटक केली. पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब घावटे यांनी दिली आहे.

हेही वाचा -VIDEO : चोरट्याने पवनपुत्राला नमस्कार केला अन दानपेटी घेऊन पळाला

हेही वाचा -हृदयदावक : पतीने केला झोपीतच पत्नीसह मुलीचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; आरोपी अटक

ABOUT THE AUTHOR

...view details