महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

येत्या काही तासांत शाहीनची तीव्रता वाढणार, २-३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता - शाहीन चक्रीवादळ

'शाहीन' चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झाले आहे. शाहीन हे नाव ओमन देशाने दिले आहे. येत्या काही तासांत शाहीन चक्रीवादळाची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे येत्या ४ दिवसांत ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Hurricane Shaheen will hit the Arabian Sea after the Gulab
'गुलाब'नंतर अरबी समुद्रात 'शाहीन' चक्रीवादळ

By

Published : Sep 29, 2021, 1:51 PM IST

Updated : Oct 1, 2021, 5:48 PM IST

मुंबई - 'शाहीन' चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झाले आहे. शाहीन हे नाव ओमन देशाने दिले आहे. येत्या काही तासांत शाहीन चक्रीवादळाची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे येत्या ४ दिवसांत ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या दरम्यान ३० ते ४० किलोमीटर प्रतितास या गतीने वारे वाहतील. ५ ऑक्टोबरनंतर या चक्रीवादळाची तीव्रता कमी होईल.

गुलाब या चक्रीवादळाने नंतर अरबी समुद्र आणखीन एक वाजता तयार झाले आहे. या चक्रीवादळाला शाहीन असं नाव देण्यात आलेलं आहे. हे वादळ कशाप्रकारे सक्रीय होत आहे, त्याचा वेग काय आहे, याच्यावर हवामान विभाग लक्ष ठेवून आहे. अशा स्थितीत पुढील चार दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. हे चक्रीवादळ 30 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज अरबी समुद्रावर पोहोचले आहे.

शाहीनचा राज्यावर काय परिणाम होणार -

या चक्रीवादळाचा थेट परिणाम राज्यावर होणार नाही. हे चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणार नाही. हे चक्रीवादळ 1 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या दिशेने महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीपासून दूर जाणार आहे. किनारपट्टी भागातून जाणार असल्याने महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे

Last Updated : Oct 1, 2021, 5:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details