महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Chemistry question paper leak : बारावीचा पेपर फुटला; रसायनशास्त्राचा पेपर व्हाट्सअॅपवर व्हायरल; मलाडच्या कोचिंग क्लास शिक्षकाला अटक - HSC Exam

शनिवारी बारावीचा रसायनशास्त्रचा पेपर होता. मात्र रसायनशास्त्र परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्या अगोदरच मलाडच्या एका कोचिंग क्लास मधील तीन विद्यार्थ्यांना मिळाली होती. जेव्हा विलेपार्लेतील साठे महाविद्यालयात एक विद्यार्थीनी परीक्षेला उशीरा आल्याने तिची चौकशी केली असता, प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड झालाचा धक्कादायक प्रकार समोर आला. विलेपार्ले पोलिसांनी याप्रकरणी खासगी कोचिंग क्लासमधील शिक्षक मुकेश यादव याला ताब्यात घेतले आहे.

HSC 12th chemistry question paper leak tuition teacher arrested by mumbai  police
बारावीचा पेपर फुटला

By

Published : Mar 14, 2022, 10:51 AM IST

मुंबई- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची ( Maharashtra State Board Of Secondary & Higher Secondary Education ) बारावीची परीक्षा ( HSC Exam ) 4 मार्चपासून सुरू झाली आहे. शनिवारी झालेल्या बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची ( Chemistry question paper leak ) धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील मालाड परिसरात एका खासगी कोचिंग क्लासमध्ये हा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी ( Mumbmai Police ) याबाबत गुन्हा नोंदवून कोचिंग क्लास शिक्षकाला अटक केली आहे.

काय आहे प्रकरणमिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी बारावीचा रसायनशास्त्रचा पेपर होता. मात्र रसायनशास्त्र परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्या अगोदरच मलाडच्या एका कोचिंग क्लास मधील तीन विद्यार्थ्यांना मिळाली होती. जेव्हा विलेपार्लेतील साठे महाविद्यालयात एक विद्यार्थीनी परीक्षेला उशीरा आल्याने तिची चौकशी केली असता, प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड झालाचा धक्कादायक प्रकार समोर आला. विलेपार्ले पोलिसांनी याप्रकरणी खासगी कोचिंग क्लासमधील शिक्षक मुकेश यादव याला ताब्यात घेतले आहे.


बोर्डाकडून स्पष्टीकरण नाही

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तीन विद्यार्थ्यांची सखोल चौकशी सुरू आहे. पेपरफुटीसाठी आणखी कोणाच सहभाग आहे का, पेपर मिळवण्यासाठी काही आर्थिक व्यवहार झाला का, याची चौकशी सुरू आहे. मात्र पेपरफुटी संदर्भात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यावर कोणतेही स्पष्टीकरण अद्यापही आलेले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details