महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

हनी ट्रॅप ही आपली संस्कृती नाही- संजय राऊत - Social Justice Minister Dhananjay Munde

बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. याबाबत राऊत बोलत होते.

संजय राऊत

By

Published : Jan 22, 2021, 8:04 PM IST

मुंबई -धनंजय मुंडे यांच्यावर झालेले कथित बलात्काराचा आरोपाची तक्रार परत घेण्यात आली. त्यानंतर महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांचा समाचार शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतला. तसेच टिकाकारांना सल्ला दिला आहे. अशावेळी राजकीय राग, लोभ, द्वेष मध्ये आणू नका, किमान अशा प्रकरणात माणुसकी ठेवा. सत्यता तपासून मत व्यक्त करात. तपास यंत्रणांना वेळ द्या हनी ट्रॅप ही आपली संस्कृती नाही. राजकीय दबावात काय होतं. हे आम्ही त्या नटीच्या प्रकरणात पाहिलं, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

संजय राऊत

धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा-

बलात्काराच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून वादात अडकलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. याबाबत राऊत बोलत होते.

हनीट्रॅप ही महाराष्ट्राची संस्कृती नाही-

या प्रकरणामध्ये पहील्याच दिवसांपासून मी सांगत होतो थोडं थांबा सत्य बाहेर येऊ द्या. समाजकारण आणि राजकारणामध्ये उभे राहण्यासाठी खूप कष्ट आणि वेळ लागतो. कोणत्याही मंत्र्यांवर अशाप्रकारचे आरोप होणं योग्य नाही. पण आता ती जळमटं दूर झाली आहे. चारित्र्यहनन हे राजकारणात हल्ली एक मोठं शस्त्र बनत आहे. हनीट्रॅप ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, राजकारण नाही. जर ते कुणी करत असेल तर ते महाराष्ट्राला डाग लावत आहेत, असंही राऊत म्हणाले.

हेही वाचा-बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळा अनावरणाला दिग्गजांची हजेरी; ठाकरे बंधू एकत्र येणार

ABOUT THE AUTHOR

...view details