महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Home Minister Statement on Hijab : 'हिजाबसारखा प्रश्न शाळा-काॅलेजमध्ये आणणं दुर्दैवी' - दिलीप वळसे पाटील हिजाब

कर्नाटक राज्यातील शाळेतील हिजाबवरील वाद आता देशभर पसरला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हिजाबसारखा प्रश्न शाळा काॅलेजमध्ये आणणे चुकीचं आहे. शाळा आणि काॅलेज हे शिक्षणाचे ठिकाण आहे. त्याठिकाणी अशा गोष्टी होऊ नये.

Home Minister
Home Minister

By

Published : Feb 10, 2022, 1:02 PM IST

Updated : Feb 10, 2022, 2:09 PM IST

मुंबई -कर्नाटक राज्यातील शाळेतील हिजाबवरील वाद आता देशभर पसरला आहे. राज्यात सुद्धा त्याचे पडसाद उमटत आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हिजाबसारखा प्रश्न शाळा काॅलेजमध्ये आणणे चुकीचं आहे. शाळा आणि काॅलेज हे शिक्षणाचे ठिकाण आहे. त्याठिकाणी अशा गोष्टी होऊ नये. तसेच इतर राज्यातील मुद्दे महाराष्ट्रात उचलून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करणे देखील चुकीचे आहे. शिवाय राजकिय नेत्यांनीही असे आंदोलन करू नये, अशी अपेक्षा त्यांनी वर्तवली आहे

पोलीस भरती पूर्णपणे पारदर्शक

राज्य सरकारकडून करण्यात येत असलेली पोलीस भरती ही पूर्णपणे पारदर्शक आहे. पोलीस भरती मध्ये काही उमेदवार डमी असल्याचं लक्षात आलं होतं. त्याबाबत गुन्हा नोंदवला गेला असून, संबंधित लोकांना अटक करण्यात आले असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Feb 10, 2022, 2:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details