मुंबई - अमेरिकेत बॉलिवूड इव्हेंट आयोजित करून आयएसआयला पैसे पुरवणाऱ्या रेहान सिद्दीकी आणि त्याच्या साथीदारांवर कारवाई करण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. यासंदर्भात उचीत चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
भारतविरोधी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानी रेहान सिद्दीकीची चौकशी होणार: गृहमंत्र्यांची घोषणा - राहूल शेवळेंची मागणी
'आयएसआय'ला आर्थिक मदत करणाऱ्या रेहान सिद्दीकीच्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावणाऱ्या बड्या बॉलिवूड कलाकारांची ईडी (सक्तवसुली संचालनालय) आणि एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) च्या मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी आता लावून धरली आहे. याच संदर्भात गृहमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल देशमुख
अनिल देशमुख म्हणाले यासंबंधी खासदार राहुल शेवाळे यांनी दिलेले पत्र मला आहे. मी गृह विभागाच्या माध्यमातून या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी करेल आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा -'त्या' कार्यक्रमात सामील झालेल्या सेलिब्रिटींची केंद्रीय चौकशी करा; खासदार राहुल शेवाळेंची मागणी