महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Student Agitation in Mumbai : चिथावणीखोर हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठक अटकेत; मागितली बिनशर्त माफी - विद्यार्थ्यांचे आंदोलन

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलन प्रकरणात हिंदुस्थानी भाऊला धारावी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काल त्याने सोशल मीडियावर पोस्ट केल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन झाल्याचा आरोप आहे.

हिंदुस्थानीभाऊ
हिंदुस्थानीभाऊ

By

Published : Feb 1, 2022, 7:30 AM IST

Updated : Feb 1, 2022, 4:38 PM IST

मुंबई -शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलन प्रकरणात हिंदुस्थानी भाऊला धारावी पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. काल त्याने सोशल मीडियावर पोस्ट केल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन झाल्याचा आरोप आहे. हिंदुस्थान भाऊला बांद्रा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, त्याला तीन दिवसांची पोलीस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तरूणांना भडकावल्या प्रकरणी हिंदुस्थान भाऊ अटकेत

बिग बॉसच्या माजी स्पर्धक आणि सोशल मीडियावर हिंदुस्तानी भाऊ म्हणून प्रसिद्ध असलेला विकास पाठकने ( Vikas Pathak in Students agitation ) सोशल मीडियावर आंदोलनात विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमले होते. विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याने मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. हिंदूस्थानी भाऊ’च्या चिथावणीमुळे सोमवारी धारावीत हजारो विद्यार्थी जमले. दुपारी १२ ते १ दरम्यान धारावीत विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी झाली. विद्यार्थ्यांनी घोषणा फलकांद्वारे सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला. काही वेळातच विद्यार्थ्यांनी रस्त्यावर हुल्लडबाजी सुरू केली आणि दगड, चपला, अंडी फेकली. त्यात काही पोलीसही जखमी झाले. त्यानंतर विकास पाठक ( हिंदुस्तानी भाऊ ) विद्यार्थ्याच्या आंदोलनात सहभागी ( Hindusthani Bhau in Students Agitation ) झाला होता. दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षांविरोधात करण्यासाठी विद्यार्थ्याकडून राज्यभरात मोठ्या प्रमाणात ( Students Agitation for online exam ) आंदोलन करण्यात आले आहे. मात्र, या आंदोलनाला यशस्वी करण्याचे काम हिंदुस्तानी भाऊने ( Hindusthani Bhau viral video ) केले आहे.

शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन हे योग्य नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी हुशार व अभ्यास करणारा आहे. दोन दिवसांपासून या प्रकरणात सुरू असलेल्या सर्व गोष्टींचा तपास केला जाईल. हे कृत्य कोणत्या संघटनेकडून ठरवून करण्यात आले आहे का, याची शहानिशा करून, याचा पूर्णपणे छडा लावून योग्य ती कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केले. विकास जयराम पाठक उर्फ ​​हिंदुस्थानी भाऊ (वय ४१) आणि इकरार खान वखार खान मुस्लिम याला अटक केली आहे.

हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठक अटकेत; मागितली बिनशर्त माफी

मात्र, या आंदोलनानंतर हिंदुस्तानी भाऊने बिनशर्त माफी मागितली आहे. तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा हा आंदोलनामागचा हेतू होता, असं त्याने स्पष्ट केले. दरम्यान, मुंबईसह नागपूर, अकोला, औरंगाबाद, पुणे आणि उस्माबानाबादमध्येही दहावी, बारावीच्या परीक्षांविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश यला मिळाला. विद्यार्थ्यांनी बस आणि इतर वाहनांच्या तोडफोड करत निषेध व्यक्त केला. यावेळी विद्यार्थ्यांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज केला. मुंबईतील धारावी परिसरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी हिंदुस्तानी भाऊला जबाबदार धरण्यात आले आहे. दंगल, महाराष्ट्र पोलीस कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अक्ट या अंतर्गत हिंदुस्तानी भाऊ विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Last Updated : Feb 1, 2022, 4:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details