मुंबई - समृद्धी महामार्ग राजा मधील देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना या योजनेअंतर्गत नागपूर ते मुंबई दरम्यानचा रस्त्याने लागणारा वेळ 15 तासावरनं आठ तासावर येणार आहे. आणि समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचे काम देखील पूर्ण झालेले आहे. प्रत्यक्ष रस्त्याचे काम सुद्धा पूर्ण होत आलेले आहे 701 किलोमीटरच्या महामार्गाचे काम हे जवळजवळ पूर्ण झालेले आहे. चार चार रांगांचे दोन मार्ग असतील आणि आता त्यासोबत गतिशक्ती रेल्वे देखील धावण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेले आहे.
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाला समांतर गतिशक्तीने रेल्वेही धावणार -देवेंद्र फडणवीस
२०१४ ते २०१९या कालावधीत फडणवीस सरकारची महत्वकांक्षी योजना पुन्हा सुरू होणार आहे. समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू असून, या महामार्गावर समांतर गतिशक्ती रेल्वे आणि कार्गो धावणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले आहे. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
समृद्धी महामार्ग
या आधी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये याबद्दलचे सुतोवाच जाहीर केले होते. मात्र, समृद्धी महामार्गाला अनेक अडथळे होते. ते अडचणी आता पार होताना दिसत आहे. समृद्धी महामार्गावरच त्याला समांतर रेल्वेचा ट्रॅक टाकून रेल्वे चालवण्याबाबतचा शासनाचा विचार आहे. या रेल्वेची गती प्रती तास 200 किलोमीटर इतकी राहील आणि मुंबई ते नागपूर हे अंतर चार तासात पूर्ण होईल अशी माहिती आहे.