मुंबई १५ ऑगस्ट रोजी देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य 15th August Independence Day मिळाले, तेव्हापासून आपण दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन Independence Day साजरा करतो. यंदा आपल्या स्वातंत्र्यास ७५ वर्ष पूर्ण होत असून देशात अमृत महोत्सव साजरा Independence Amrit Mahotsav केला जाणार आहे. या दिवशी देशाला शत्रूंकडून खासकरून दहशतवादी आणि समाजविघातक लोकांकडून अधिक धोका असतो. हा धोका लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी शहराच्या बंदोबस्तात वाढ केली आहे.
संपूर्ण शहरावर कडक नजर ठेवण्यात येणार आहे अमृत महोत्सवाला Amrit Mahotsav गालबोट लागू नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, हे लक्षात घेऊन संशयित असलेल्या सर्वांचा शोध घेतला जात असून बॉम्ब शोधक Bomb Squad व निकामी पथक (बीडीडीएस) मार्फत परिसराची तपासणी केली जात आहे. मुंबईतील 94 पोलीस ठाण्यांच्या प्रभारींना त्यांच्या अखत्यारीतील अतिदक्षता आणि गस्त घालण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय अँटी टेरर सेल (एटीसी) आणि बीट अधिका-यांना छोट्या भागांमधून गुप्तचर माहिती गोळा करण्यास सांगितले आहे.