मुंबई - पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याठी दादरमधील सर्व दुकानदार व्यापारी पुढे आले आहेत. दादरमधील प्रसिद्ध सुविधा शोरूम मालक शांती भाय मारू यांनी हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ११ लाख रुपयांची मदत दिली आहे.
सुविधा शोरुमच्या मालकाकडून हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना अकरा लाखांची मदत - मुंबई
दादरमधील प्रसिद्ध सुविधा शोरुम मालक शांतीभाय मारू यांनी हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ११ लाख रुपयांची मदत दिली आहे. त्यांचे कार्य पाहून दादरमधील अनेक व्यापारी, दुकानदार हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदतनिधी उभारत आहेत.
काही वर्षांपूर्वी शांतीभाय मारू हे लडाखमध्ये गेले असता तेथे जवानांवर हल्ला झाला होता. त्यावेळी त्यांनी जवानांना झालेल्या इजा, दुःख जवळून पाहिले होते. म्हणून त्यांनी पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांच्या कुटुंबांना मदत करण्याचे ठरवले.
त्याचबरोबर हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना शक्य होईल तेवढी मदत करणार असल्याचेही मारू यांनी सांगितले. माझे कार्य पाहून दादरमधील अनेक व्यापारी, दुकानदार हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदतनिधी उभारत आहेत, असेही त्यांनी सांगितले.