मुंबई- शहरातील काही भागात बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. बुधवारी रात्री साडेआठ ते गुरुवारी सकाळी साडेसहा वाजेपर्यंत वांद्रेमध्ये २०१ मिमी आणि महालक्ष्मी या भागात १२९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तसेच आज (गुरुवारी)देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या २४ तासांत मुंबई उपनगरामध्ये १९१.२ मिमी, तर दक्षिण मुंबईमध्ये १५६.४ मिमी पावासाची नोंद करण्यात आली. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचे हवामान विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी सांगितले.
राज्यातील काही जिल्ह्यातील पावसाची नोंद -
जिल्हा | पाऊस(मिमी) |
रत्नागिरी | १२७.२ |
बेलापूर | ५८.८ |
नांदेड | ९६.४ |
उस्मानाबाद | २५.८ |
जळगाव | ५३ |
रायगड |