मुंबई- मान्सून 11 जूनला तळकोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल झाला आहे. आज 12 जून रोजी हर्णे, बीड आणि काही भागामध्ये दाखल झाला आहे. वातावरण अनुकल असल्याने येत्या 48 तासात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र मान्सून व्यापून टाकेल, अशी माहिती कुलाबा वेधशाळेच्या हवामान तज्ज्ञ शुभांगी भूत्ते यांनी आज दिली.
शुभांगी भूत्ते, हवामान तज्ज्ञ आज आलेल्या पावसाच्या नोंदीनुसार संगमेश्वर आणि सिंधुदुर्ग येथे काही ठिकणी 140 मिलिमीटर, मालवणमध्ये 158 मिलिमीटर, मराठावाडा बीडमध्ये 62 मिलीमीटर, उदगीरमध्ये 65 मिली मीटर, मुखेडमध्ये 61 मिली मीटर पाऊस पडला आहे. येत्या 48 तासात संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला जाईल, अशी माहिती भूत्ते यांनी दिली.
पुढील हवामानाचा अंदाज
१३ जून - कोंकण - गोवा व विदर्भात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता
१४ जून - कोकण- गोवा काही ठिकाणी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता
15 जून - कोकण - गोवा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
16 जून- कोकण - गोवा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.