मुंबई - मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक खोळंबली आहे. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दोन दिवस मुंबईतील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे ट्विट करून सांगितले आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरात सर्वाधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे जोगेश्वरी येथील पिंपरीपाडा येथे भिंत कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत पावसाचा हाहाकार; भिंत कोसळून १८ जण ठार - heavy rain
मुंबईत पावसाने हाहाकार माजवला आहे. पिंपरीपाडा येथे एक भिंत कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे केली आहे.
यंदा मान्सून उशिराने दाखल झाला आहे. मात्र पुण्यात कोंढवा येथे ८ दिवसांपूर्वीच एक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाल होता. ही घटना ताजी असतानाच मुंबईत पावसामुळे भिंत कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना २६ जुलैची आठवण येत आहे. यापुर्वी २६ जुलैला मुंबईत झालेल्या पावसामुळे मुंबई पुर्णपणे ठप्प झाली होती. गेल्या २५ वर्षातील सर्वाधिक पाऊस असल्याचे मुंबईकर म्हणत आहेत. मुंबईत दक्षिण उपनगरात ३७५ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. सध्या थोडे उन पडले आहे. उन्हामुळे पाण्याचा निचरा होईल. मुंबईच्या पश्चिम उपनगरावरील रेल्वे मार्ग सुरू होत आहे. तर मध्य रेल्वे काही काळ सुरू होते आणि बंदही होत आहे. तर हार्बर लाईनवरील सेवाही थोड्या प्रमाणात सुरू आहे. पावसामुळे लोकलची वाहतूक खोळंबली आहे. पिंपरी पाडा येथील दुर्घटनेत मृत पावलेल्यांना ट्रामा केअरच्या रुग्णालयात आणले आहे. नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यासाठी वेळ लागणार असल्याचे रूग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.