Petition Against Mamata : ममता बॅनर्जी यांच्याविरोधातील याचिकेवर 27 जुलै रोजी सुनावणी
पश्चिम बांग्लाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरोधात (petition against Mamata Banerjee ) दाखल राष्ट्रध्वजाचा अवमान प्रकरणाची सुनावणी आज झाली नाही. मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) आता 27 जुलै रोजी पुढील सुनावणी (Hearing on July 27) होणार आहे. भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी ममता बॅनर्जी विरोधात गुन्हा दाखल करावा अशी याचिका दाखल केली आहे.
मुंबई: शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टातून रेकॉर्ड आणि प्रेसिडिंग कागदपत्र आणि पुरावे मुंबई सत्र न्यायालयात न आल्यामुळे आज या प्रकरणाची सुनावणी झाली नाही. आता पुढील सुनावणी 27 जुलै रोजी होणार आहे. भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात या मागणीसाठी याचिका दाखल केली आहे. त्या विरोधात ममता बॅनर्जी यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतलेली होती.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईतील कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यामागणीकरिता मुंबईतील भाजप कार्यकर्ते गुप्ता यांनी माझगाव दंडाधिकारी कोर्टात याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना 2 मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते त्याविरोधात ममता यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली मुंबई सत्र न्यायालयाने माझगाव दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत ममता यांना दिलासा दिला होता.
ममता बॅनर्जी या 1 डिसेंबर 2021 रोजी मुंबईच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यां एका कार्यक्रमात खुर्चीवर बसलेल्या असतानाच, राष्ट्रगीताला सुरुवात झाली. चार-पाच ओळी झाल्यानंतर त्या थांबल्या, असे तक्रारीत म्हटले आहे. ममता यांच्या या कार्यक्रमानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या या कृतीवरून टीका केली. ममता यांनी खुर्चीवर बसूनच राष्ट्रगीताला सुरुवात केली. त्यानंतर त्या जागेवरून उठल्या. त्यां काही ओळी गायल्यानंतर थांबल्या. मुख्यमंत्र्यांनी बंगालच्या संस्कृतीचा अपमान केला आहे. राष्ट्रगीताचा अपमान केला तसेच संपूर्ण देशाचाही अपमान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.