महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वृत्तांकन करताना मर्यादांचे काटेकोरपणे पालन करा, उच्च न्यायालयाचे सुनावले - Arnab Goswami news

वृत्तांकन करत असताना तुम्हाला घालण्यात आलेल्या मर्यादांचे आणि नियमांचे पालन तुम्ही काटेकोरपणे करायला हवे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मीडिया ट्रायलच्या संदर्भात माजी ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.

मुंबई उच्च न्यायालय
मुंबई उच्च न्यायालय

By

Published : Oct 22, 2020, 1:24 PM IST

मुंबई- सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी सुरू असलेल्या मीडिया ट्रायलच्या संदर्भात माजी ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. वृत्तांकन करत असताना तुम्हाला घालण्यात आलेल्या मर्यादांचे आणि नियमांचे पालन तुम्ही काटेकोरपणे करायला हवे असे, उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत एका वृत्तवाहिनीला प्रतिवादी करण्यात आले आहे. सुनावणीदरम्यान प्रतिवादी असलेल्या वृत्तवाहिनीच्या वकिलांनी त्यांचे म्हणणे कोर्टामध्ये मांडले. वृत्तवाहिनीच्या वकिलांकडून कोर्टात सांगण्यात आले होते की, सुशांतसिंह राजपूत प्रकरणी तपासामध्ये कुठल्या त्रुटी राहिलेल्या आहेत, यासंदर्भात आम्ही शोधपत्रकारितेच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडले होते. मात्र, या वृत्तवाहिनीच्या वकिलांकडून मिळालेल्या या उत्तरावर नाराज होत, उच्च न्यायालयाने धारेवर धरले. तपास तुम्हीच करणार असाल? आरोपी आणि निर्णयही तुम्हीच देणार असाल तर, आमची या ठिकाणी गरज काय? असा सवालही न्यायालयाने केला आहे. न्यायालयातील वृत्तांकन करणाऱ्या माध्यमांवर कुठलीही मर्यादा घालू इच्छित नाही. मात्र वृत्तांकन करत असताना तुम्हाला घालण्यात आलेल्या मर्यादांचे, नियमांचे पालन तुम्ही काटेकोरपणे करायला हवे, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी वृत्तांकन करत असताना शोधपत्रकारितेच्या नावाखाली रिया चक्रवर्ती हिला अटक करावी, अशी सोशल माध्यमांवर तुम्ही मोहीम कुठल्या पद्धतीने सुरू केली होती? या प्रकरणी कोणाला अटक करायला हवी, असे तुम्ही कसे सांगू शकता? असा सवालही न्यायालयाने विचारला. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात तपास यंत्रणांना या घटनेचा तपास करण्याचे अधिकार कायद्याच्या चौकटीत मिळालेले आहेत. मात्र, हा तपास होत असताना वृत्तवाहिनीने एका भूमिकेवर राहून चालणे, हे योग्य नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details